घरमहाराष्ट्रनाशिकऑटो डीसीआरमुळे बांधकामांची माहीती आता डॅशबोर्डवर

ऑटो डीसीआरमुळे बांधकामांची माहीती आता डॅशबोर्डवर

Subscribe

कामाकाजात येणार पारदर्शकता : घरबसल्या करता येणार अर्ज

नाशिक महापालिकेने बांधकामांची परवानगी तसेच नगररचना विभागाच्या माध्यमातून दिल्या जाणारया परवानग्या देण्यासाठी ऑटोडीसीआर प्रणाली कार्यान्वित केली आहे. त्यामुळे बांधकामांची परवानगी घेण्यासाठी सामान्यांपासून तर बांधकाम व्यावसायिकांपर्यंत सर्वांनाच आता महापालिकेची उंबरठे झिजविण्याची गरज पडणार नाही.

नगररचना विभागाच्यावतीने बांधकाम व्यावसायिक, वास्तुविशारद यांना आपले विविध विकसन परवानग्या, इमारत बांधकाम परवानग्या व इतर तद्अनुषंगिक परवानग्या देण्याचे कामकाज करण्यात येते. या कामात पारदर्शकता, अचुकता व गतीमानता निर्माण येण्याच्या दृष्टीने Online Building Permission Application (AUTODCR) कार्यप्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे घरी बसूनच ऑनलाईन परवानगीसाठी अर्ज करता येणार असून नगररचना विभाग ऑनलाईन् नकाशे, कागदपत्रे ले आउट तपासून परवानी देउ शकेल. बांधकामांच्या परवानग्या सहज मिळत नसल्याची तक्रार होती. मात्र आता या प्रणालीमुळे बांधकाम किंवा ले आउट तसेच जमीन विकसनांसर्दभात परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.

- Advertisement -

नाशिक महानगरपालिकेच्या संकेतस्थळ www.nmc.gov.in यांवर Building Plans या सदरांतर्गत dashboard उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. सदर डॅशबोर्डचा वापर करुन नागरिकांना नाशिक महानगरपालिकेस सादर केलेल्या विकसन प्रस्तावाच्या प्राप्तता, प्रक्रिया, स्विकृती, प्रलंबिततेबाबतची स्थिती जाणुन घेता येईल. तसेच सर्व नागरिकांना कामकाजाची माहिती ऑनलाईन बघता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -