घरमहाराष्ट्रनाशिकआदिवासी वसतिगृहाचा रस्ता ठरतोय डोकेदुखी

आदिवासी वसतिगृहाचा रस्ता ठरतोय डोकेदुखी

Subscribe

ठेकेदाराकडून दूरूस्तीकामात चालढकल

पेठरोड येथील आदिवासी विकास विभागाचे वसतीगृह, एकलव्य मॉडेल निवासी शाळेकडे जाणारा मार्ग खड्यात सापडला आहे. खात्याचे मंत्री या संकुलात भेट देण्यास येणार म्हणून ठेकेदारांकडून रस्त्यांचे दूरूस्तीकाम करण्याचे प्रास्तावित होते. मात्र, मंत्र्यांचा दौरा रद्द होताच हा रस्ता तात्पुरते खडी टाकून कामात चालढकल करण्यात आली.

यापूर्वी, आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक ऊईके यांनी पेठरोड येथील एकलव्य रेसीडेन्सियल स्कूलला भेट देत अचानक पाहणी करत शाळेच्या दृरूस्ती, देखभाल कामात त्रुटी पाहिल्या, काम करून दूरूस्ती करून घेतली नाही म्हणून मंत्र्यांनी गृहपालाचे निलंबन केलेले होते. त्यामुळे पुन्हा मंत्र्यांचा दौरा झाला तर रस्त्यांच्या दूरूस्ती कामावरून झापले जावू नये म्हणून आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकार्‍यांनी येथील कामाला प्राधान्य देत रस्ता दूरूस्तीचे काम ठेकेदाराला सोपावले होते मात्र, येथे ठेकेदाराने कामात ढिसाळ घाई करून काम केल्याने त्याचा भुर्दंड येथील विद्यार्थ्यांना बसत आहे.

- Advertisement -

रस्त्यावर नुसती कच टाकण्यात आल्याने शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांचे वाहने रूतून बसत आहेत. तसेच पायी जाणार्‍या विद्यार्थ्यांनाही त्रास सोसावा लागत असल्याने या मार्गाचे काम डोकेदूखी ठरलेले आहे. डांबर न टाकता रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये खडी आणि कचचा भराव टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे वाहने घसरत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -