घरमहाराष्ट्रनाशिकभाजप इच्छुकांच्या ४ सप्टेंबरला मुलाखती

भाजप इच्छुकांच्या ४ सप्टेंबरला मुलाखती

Subscribe

१५ मतदारासंघासाठी करणार चाचपणी : आमदारांची वाढली धडधडी

भाजप शिवसेना युतीला अद्याप मुर्तरूप आलेले नाही. अशातच युती होणार की नाही, याबाबत संभ्रम असतानाच जिल्हयातील पंधराही मतदारसंघासाठी भाजपने बुधवारी ४ सप्टेंबर रोजी पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात घेण्यात येणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकीसाठी भाजपची स्वबळावर लढण्याची तयारी तर सुरू नाही ना, अशी चर्चा राजकिय वर्तुळात केली जात आहे. या मुलाखतींच्या कार्यक्रमामुळे विद्यमान आमदारांचीही धडधड वाढली आहे.

भाजप सनेने लोकसभा निवडणूक युती करून लढवली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही युती कायम राहील, असे दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते सांगत आहेत, असे असले तरी भाजपकडून स्वबहाची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. याचा प्रत्यय भाजपने राज्यातील विविध जिल्हयांमध्ये घेतलेल्या मुलाखतीदरम्यान आला. समजा ऐनवेळी युती तुटलीच तर गडबड नको याकरीता भाजपकडून खबरदार घेतली जात असल्याचे यावरून दिसून येते. नाशिमध्येही पंधराही मतदारसंघासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत.

- Advertisement -

भारतीय जनता पक्षाचे संघटनमंत्री किशोर काळकर, भाजप प्रदेशमंत्री योगेश सागर व जिल्हाध्यक्ष दादा जाधव व भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे या मुलाखती घेणार आहेत. जिल्ह्यात शिवसेनेचे देवळाली, निफाड, मालेगाव बाह्य, सिन्नर येथे आमदार आहेत. या मतदारसंघातील इच्छुकांनाही यावेळी आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा स्थानिक पातळीवर गोंधळ वाढला आहे. त्याचप्रमाणे २००९ मध्ये शिवसेना-भाजप युती असताना शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांनाही बोलावण्यात आले आहे. या आमंत्रणामुळे भाजपच्या इच्छुकांमध्ये उत्साह आहे, तर शिवसेनेचे नेते काहीसे गोंधळले आहेत.

भाजप पदाधिकारयांची घालमेल

नाशिक शहरातील तीनही मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार आहेत मात्र या मतदारसंघातून भाजपांर्तगत ईच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारी देतांना पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. ज्या मतदारसंघात जो विद्यमान आमदार असेल पुढल्यावेळी त्यालाच पुन्हा उमेदवारी दिली जाते असे मानले जाते मात्र विद्यमान आमदारांविरोधात पक्षांतर्गत गट सक्रिय झाल्याने तसेच काहींनी तर परस्पर आपली उमेदवारी गृहीत धरून प्रचारही सुरू केल्याने पक्ष काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -