घरमहाराष्ट्रनाशिकपीकअपच्या चोरकप्प्यात सापडला १० लाखांचा मद्यसाठा

पीकअपच्या चोरकप्प्यात सापडला १० लाखांचा मद्यसाठा

Subscribe

मासे वाहतुकीचा बनाव; उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत गुजरातमधील चालकाला वाहनासह अटक

वाहनातून माशांची वाहतूक केली जात असल्याचे भासवत अवैध मद्यवाहतूक करणाऱ्या एकाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून गाडीसह ३७९ सीलबंद बाटल्यांचा १० लाख रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. ही कारवाई त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा फाटा येथे करण्यात आली.

फरीदभाई रखाभाई उनडजाम (३७, रा. उमेज, ता. उना, जि. गिरसोमनाथ, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक मधुकर राख यांना अवैध मद्यसाठ्याची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार भरारी पथकाने सीमावर्ती भागात गस्त घालत वाहन तपासणी सुरु केली. त्यात महिंद्रा बोलेरो पीकअप (जी.जे.१४, एक्स-६३९३) च्या तपासणीत गाडीमध्ये महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंध असलेला विदेशी मद्यसाठी सापडला. पथकाने ९४ हजार ७५० रुपये किंमतीच्या ३७९ सीलबंद बाटल्या व पीकअप वाहन असा एकूण १० लाख ५ हजार ५२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई निरीक्षक मधुकर राख, प्रवीण मंडलिक, धनराज पवार, श्याम पानसरे, सुनील पाटील, विलास कुवर, मच्छिंद्र आहिरे, अनिता भांड यांच्या पथकाने केली.

- Advertisement -

असा झाला उलगडा

पथकाने सुरुवातीला पिकअपची तपासणी केली असता वाहनात प्रथमदर्शनी काहीच सापडले नाही. चालकाकडे चौकशी केली असता त्यानेही कोणतीच माहिती दिली नाही. पथकाने पुन्हा वाहनाची तपासणी केली. त्यावेळी थर्माकोलचे बॉक्स रिकामे दिसले तर टायर वजनामुळे दबलेले दिसले. पिकअपची बाहेरील बाजूने तपासणी करताना चोरकप्प्यात लपवून ठेवलेला मद्यसाठा सापडला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -