घरमहाराष्ट्रनाशिकवेतनकरार प्रश्नी ‘एचएएल’चे २० हजार कर्मचारी संपावर

वेतनकरार प्रश्नी ‘एचएएल’चे २० हजार कर्मचारी संपावर

Subscribe

देशव्यापी आंदोलन; विमान देखभाल-दुरुस्तीची कामे रखडणार; १२०० लघु उद्योगांनाही फटका

प्रलंबित वेतन करारासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय एचएएल कामगार ट्रेड युनियनची बंगळूरू येथील चर्चा फोल ठरल्याने नाशिकसह देशभरातील एचएएलच्या नऊ विभागांतील सुमारे २० हजार कर्मचार्‍यांनी सोमवारपासून (दि.१४) संप पुकारला आहे. जिल्ह्यातील साडेतीन हजार कर्मचारी कायमस्वरूपी, तर तीन हजार कंत्राटी कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. यामुळे देशभरात ‘एचएएल’मधील विमान दुरुस्तीसह विमान बांधणीची कामे रखडणार आहेत. तर एचएएलवर अवलंबून असलेल्या सुमारे दीड हजार लघु उद्योजकांनाही संपाचा फटका बसणार आहे.

गेल्या तीन वर्षांपासून अधिकारी वर्ग वाढीव पगाराचा लाभ घेत असून, फक्त कामगारांना त्यांच्या हक्कांपासून दूर ठेवण्याचे काम एचएएलचे उच्च व्यवस्थापन करत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. आठवडाभरावर दिवाळी सण आला असताना, हे आंदोलन सुरू झाल्याने खुद्द कामगारांसह एचएएलवर अवलंबून असलेल्या लघुउद्योजकांनाही मोठा फटका बसतो आहे. तसेच, नाशिक युनिटमध्ये सुरू असलेल्या सुखोईच्या ओव्हर ऑईलिंगच्या कामावरही आंदोलनाचा परिणाम होणार आहे.

- Advertisement -

लढा सुरूच राहणार

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आम्ही प्रलंबित मागण्यांसाठी लढा देत आहोत. मात्र, व्यवस्थापन तुटपुंजी वेतनवाढ देऊन कामगारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. बंगरूळ येथील बैठक ही केवळ कामगारांची फसवणूक आहे. कंपनीकडून धाकटशाही करण्यात येत आहे. कामगारांना कामावरून काढण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत. मात्र, आमचा हा लढा सुरूच राहणार असून अधिकारी वर्गाच्या धर्तीवरच कामगारांनाही वेतनवाढ देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. – भानुदास शेळके, अध्यक्ष, एचएएल कामगार संघटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -