घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये ६ नगरसेवकांविरुद्ध गुन्हे

नाशिकमध्ये ६ नगरसेवकांविरुद्ध गुन्हे

Subscribe

जलकुंभाचे विनापरवानगी उद्घाटन भोवले, अंबडमधील घटना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची परवानगी न घेता नगरसेवकांनी जलकुंभाचे लोकार्पण कार्यक्रम रविवारी (दि.२६) छत्रपती शिवाजी महाराज समाज मंदिर, महालक्ष्मी नगर, अंबड येथे आयोजित केला. तसेच, अंबडमध्ये विनापरवानगी रस्ता काँक्रिटीकरणाचे उदघाटन करण्यात आले. याप्रकरणी अंबड पोलिसांनी सहा नगरसेवकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

नगरसेवक दीपक दातीर, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, नगरसेविका सुवर्णा मटाले, नगरसेविका प्रतिभा पवार, नगरसेवक भागवत आरोटे, नगरसेवक मधुकर जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रभाग २८ मधील जलकुंभ लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आयोजकांनी पोलीस परवानगी घेतली नव्हती. तसेच, रस्ता काँक्रिटीकरण उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आयोजकांनी परवानगी घेतली नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रक्रणी पोलीस नाईक सचिन सोनवणे यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सहा नगरसेवकांवर गुन्हे दाखल केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -