घरताज्या घडामोडीPunjab Congress : नवज्योत सिंग सिद्धूंचा पंजाब कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा, सोनिया गांधींना...

Punjab Congress : नवज्योत सिंग सिद्धूंचा पंजाब कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा, सोनिया गांधींना पाठवले पत्र

Subscribe

चन्नी मुख्यमंत्री झाल्यावर सिद्धू सुपर मुख्यमंत्री म्हणून वावरत असल्याचा आरोप होत होते.

पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसत आहे. नुकतेच काँग्रेसने मुख्यमंत्री बदलले असून नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पुर्ण करण्यात आला आहे. कॅप्टन अमरिंद सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजानामा दिला असून मुख्यमंत्रीपदाची सुत्रे चरणजीत सिंह चन्नी यांच्याकडे दिली आहे. तर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्राद्वारे आपला राजीनामा सादर केला आहे. सिद्धूंच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद असल्याचे स्पष्ट झाले आहे. सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यात असलेल्या वादामुळे कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याचेही समजते आहे.

पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पाठवला आहे. पदाचा राजीनामा देत असलो तरी आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे सिद्धू यांनी स्पष्ट केलं आहे. नवज्योत सिंग सिद्धू काँग्रेसमध्ये नाराज होते. पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या मंत्रिमंडळात सिद्धूंच्या लोकांना मंत्रीपद देण्यात आले परंतु त्यांना चांगली खाती देण्यात आली नाही. चन्नी मुख्यमंत्री झाल्यावर सिद्धू सुपर मुख्यमंत्री म्हणून वावरत असल्याचा आरोप होत होते. तसेच सिद्दधूंना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली नाही. यामुळे मोठा सिद्धू नाराज होते.

- Advertisement -

पंजाब मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावाने नाही तर सिद्धूंच्या नावाने आगामी निवडणुका लढवण्यात येतील असे काँग्रेस प्रभारी हरिश रावत यांनी म्हटलं होते. यावर अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी दर्शवल्यानंतर निवडणुका मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात लढवण्यात येतील असे ठरवण्यात आले आहे. या सर्वामुळे काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू नाराज होते. यामुळे सिद्धूंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

नवज्योत सिंग सिद्धंच्या नाराजीमागील कारण?

नव्या मंत्रिमंडळात सुखविंदर सिंह रंधावा यांना गृहमंत्री पद देण्यात आले. याला नवज्योत सिंग सिद्धू यांचा आणि त्यांच्या साथीदारांचा विरोध होता. अमृतसर सुधार ट्रस्टचे पत्र चरणजीत सिंह चन्नी यांच्याद्वारे देण्यात आले. हे लेटर सिद्धूंना द्यायचे होते. तसेच काही अधिकाऱ्यांच्या बदली केल्यामुळे सिद्धू नाराज होते.


हेही वाचा : Sachin Vaze : …असं झाल्यास सचिन वाझे फरार होईल, NIA कडून कोर्टात भीती व्यक्त


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -