घरताज्या घडामोडीछटपूजा प्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक केशव पोरजेंवर गुन्हा

छटपूजा प्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक केशव पोरजेंवर गुन्हा

Subscribe

उपनगर पोलिसांकडून साथरोग प्रतिबंधप्रकरणी गुन्हा दाखल, कारवाईदरम्यान अधिकारी मात्र विनामास्क

नाशिकरोड – उत्तर भारतीयांच्या आस्थेचा सण म्हणून ओळख असलेल्या छट पुजेचे आयोजन वडनेर दुमाला येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र, यंदा कोरोनामुळे निर्बंध असतानाही छट पूजेत सहभाग घेतल्याप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक केशव पोरजे यांच्यावर उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडनेर दुमाला येथील वालदेवी नदीकाठी बुधवारी (दि.१०) सायंकाळी नगरसेवक केशव पोरजे हे छट पूजा करताना दिसले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर पोलीस आयुक्तांची परवानगी नसल्याने साथरोग प्रतिबंध व आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. दरम्यान, देवळाली कॅम्प, विहितगाव, वडनेर दुमाला भागात लष्करी हद्द असल्याने या भागात हजारो उत्तर भारतीय राहतात. जवळच वडनेर दुमाला येथे वालदेवी नदीवरील घाटावर शेकडो भाविकांकडून छट पूजेसह गणेशोत्सवाचा सण साजरा करण्यात येतो.

विना मास्क पोलीस अधिकारी चर्चेचा विषय

ग्रामपंचायतींच्या पथदीप व पाणी पुरवठा योजनेचा वीजपुरवठा महावितरणने खंडीत केल्यामुळे संतप्त सरपंच व सदस्यांनी खासदार हेमंत गोडसे व माजी आमदार योगेश घोलप यांच्या नेतृत्वाखाली गेल्या महिन्यात बिटको येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकले होते. यावेळी कारवाईसाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या तोंडाला मास्क नसल्याने उपस्थितांनी प्रश्न उपस्थित केला होता. जे अधिकारी साथरोग प्रकरणावरुन कारवाई करताना विना मास्क आढळून येत असतील तर लोकप्रतिनिधींवरील कारवाईचा अधिकार दिला कुणी, अशी चर्चा आता रंगली आहे.
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -