फ्लॅटला आग; श्वास गुदमरल्याने युवकाचा मृत्यू

11 Dead In Fire Accident At Secunderabad Scrap Godown PM Modi Announce Ex Gratia
प्रातिनिधीक फोटो

फ्लॅटमधील खोलीला आग लागून श्वास गुदमरल्याने ४४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना काठे गल्लीतील बनकर चौकात घडली. आग लागल्याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ऋषिकेश श्याम पाटील (रा. शुभम् वास्तू अपार्टमेंट, काठेगल्ली, व्दारका, नाशिक ) असे मृत युवकाचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, बनकर चौकातील शुभम वास्तू अपार्टमेंटमध्ये ऋषीकेश पाटील हे आईसह राहत होते. शनिवारी (दि.२६) पहाटेच्या सुमारास त्यांच्या फ्लॅटमधून धूर येत असल्साचे शेजारील नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती भद्रकाली पोलीस व अग्निशमन दलाला दिली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांच्यासह शिंगाडा तलाव येथील अग्निशमन मुख्यालयातून फायरमन हेमंत बेळगावकर, शिवाजी फुगट, दिनेश लासुरे, राजेंद्र नाकील, चालक महेश कदम बंबासह घटनास्थळी दाखल झाले. फ्लॅटचा दरवाजा आतून बंद असल्याने बचावकार्यात अडथळा आला. भद्रकाली पोलीस व जवानांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी फ्लॅटमध्ये सर्वत्र धूर होता. जवानांना पाटील आजी दिसताच त्यांना घराबाहेर आणले. जवानांनी फ्लॅटमधील खोलीत पाण्याचा मारा करून आग विझवली. सुदैवाने आग मोठी नसल्याने अनर्थ टळला. मात्र, ऋषिकेश यांचा खोलीला आग लागली होती. जवानांना ऋषिकेश श्वास गुदमरुन मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यांना घराबाहेर आणत रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.