घरमहाराष्ट्रनाशिकदळण दळणेही आता महागले

दळण दळणेही आता महागले

Subscribe

नवीन नाशिक : महागाई व विजेचे वाढते दर तसेच घरगुती गिरण्यांच्या वाढत्या संख्येमुळे अडचणीत आलेल्या पीठ गिरणीचालकांनी दळणाचा दर एक रुपयाने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दसर्‍यापासून नवीन दर लागू होणार असल्याने आता गृहिणींची आर्थिक घडी पुन्हा बिघडणार आहे.

नवीन नाशिक परिसरात सध्या प्रतिकिलो गहू-बाजरी इ. धान्याच्या दळणाचे दर चार रुपये प्रतिकिलो आहेत. यात आता बदल होतील. गिरणीच्या सुट्या भागाच्या वाढलेल्या किंमती आणि वाढलेले वीजदर यामुळे पीठ गिरणीमालकांच्या संघटनेने दळणाचे दर एक रुपयाने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

नवीन नाशिक पीठ गिरणी मालक संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक पीठगिरणीत नवे दरपत्रक लावले जातील. गिरण्यांना वीजबिल भरणेही परवडत नसल्याचे पुढे आले आहे. एकाच भागात एकापेक्षा अधिक गिरण्या झाल्याने स्पर्धा वाढली आहे. स्पर्धेपोटी काहींनी कमी दरात दळण देण्यास सुरुवात केली आहे. तर, घरगुती गिरण्यांची संख्या वाढल्याने गिरणीचालकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. बैठकीला संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे, संजय महाले, आर. आर. पाटील, माणिक जायभावे, राजाराम मटाले, मोहन गांगुर्डे, उदय अहिरराव आदींसह गिरणीमालक उपस्थित होते.

नवे दरपत्रक 
  • गहू, ज्वारी, बाजारी : ५ रुपये प्रतिकिलो 
  • डाळी,रवा, तांदूळ, नागली : ६ रुपये प्रतिकिलो 
  • मका : ७ रुपये प्रतिकिलो 
  • मिर्ची, मसाला, हळद : ५० रुपये प्रतिकिलो 
  • ओल्या डाळी, गहू : २० रुपये प्रतिकिलो 
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -