घरक्राइमखंडणीप्रकरणी महिलेच्या पोलीस कोठडीत वाढ

खंडणीप्रकरणी महिलेच्या पोलीस कोठडीत वाढ

Subscribe

भावाच्या देवळ्यातील घरातून 8.5 लाख, ५.५ लाखांचे दागिने जप्त

स्वामी समर्थ गुरुकुलपीठाच्या विश्वस्तास धमकावून घेतलेल्या १ कोटी ५ लाख रुपये उकळणार्‍या खंडणीखोर महिलेसह तिच्या मुलाच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ केली. चार दिवसीय कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी मायलेकांसह तिच्या भावाला बुधवारी (दि.२२) न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

गुरुपीठ विश्वस्त मंडळातील कार्यकारी सदस्य निंबा मोतीराम शिरसाट (वय ५४) यांना ‘तुमचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करेल, असे वेळोवेळी धमकावून मायलेकांनी खंडणी वसूल केल्याचा प्रकार गंगापूररोड परिसरात घडला. गंगापूर पोलिसांनी संशयित महिला तथा कृषी अधिकारी सारिका बापूराव सोनवणे (वय ४२) आणि मुलगा मोहीत सोनवणे (२५) या दोघांना १० लाख रुपये घेताना शनिवारी (दि.१८) अटक केली. त्यानंतर पोलिसांनी तिचा भाऊ विनोद सयाजी चव्हाण (वय ४१, रा. देवळा) यास अटक केली. त्याच्या देवळा येथील घरी पैसे लपल्याची माहिती दोन्ही संशयितांनी चौकशीदरम्यान दिली. त्यानुसार देवळ्यात घरझडतीमध्ये १९ लाख रुपये रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -