घरताज्या घडामोडीशुभमंगल सावधान! लग्न सोहळ्यांमध्ये वाढले चोरीचे प्रमाण

शुभमंगल सावधान! लग्न सोहळ्यांमध्ये वाढले चोरीचे प्रमाण

Subscribe

नाशिक : शहरात लग्नसोहळे धुमधडाक्यात साजरे होत असताना चोर्‍या करणार्‍या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावरील राजीवनगर शिवारातील एका हॉटेलमध्ये सप्तपदीचा मुहूर्त साधत चोरट्याने नवरीचे १० लाखांचे दागिने व एक लाखाची रोकड लंपास केल्याची घटना ताजी असतानाच गंगापूर रोडवरील कवडे गार्डन लॉन्समधून गुरुवारी (दि. १७) चोरट्याने १ लाख ६ हजार रुपयांची रोकड, दागिने, मोबाईल व कागदपत्रे असा एकूण १ लाख १६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे शुभमंगल सुरू असताना वधू-वर मंडळींसह वर्‍हाडींनी सावधान राहणे गरजेचे आहे.

लग्न समारंभ सुरू असताना ओझर (ता. निफाड) विलास फकिरराव ताजणे यांची पत्नी कमल ताजणे यांनी पर्स लॉन्समधील एका खुर्चीवर ठेवली होती. त्यावेळी चोरट्याने त्यांची नजर चुकवून पर्स लंपास केली. पर्समध्ये ५ हजार रुपये किंमतीचा मोबाइल, १ लाख ६ हजार रुपये, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, ६ एटीएम कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, मतदान कार्ड असा एकूण १ लाख १६ हजार ५०० रुपयांची ऐवज होता. याप्रकरणी ओझर (ता. निफाड) विलास फकिरराव ताजणे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक के. एम. भडिंगे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -