घरताज्या घडामोडीभाजप जिल्हाध्यक्षपदी केदा आहेर बिनविरोध

भाजप जिल्हाध्यक्षपदी केदा आहेर बिनविरोध

Subscribe

भाजप नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष केदा आहेर यांची बिनविरोध निवड झाली. उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री किशोर काळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत वाणी व सह निवडणूक अधिकारी नंदकुमार खैरनार यांनी घोषणा केली.

मंगरूळ (ता. चांदवड) येथील रेणुका इव्हेंट हॉलमध्ये सोमवारी (दि.27) झालेल्या पक्षांतर्गत विशेष मेळाव्यात आहेर यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदासाठी एकूण १८ उमेदवार इच्छुक होते. जिल्हाध्यक्षपदासाठी फारसे इच्छूक नसल्याची चर्चा असताना या पदासाठी विद्यमान जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, बापू पाटील, सतिश मोरे, विलास ढोमसे, कैलास सोनवणे, चंद्रकांत राजे, केदा आहेर यांसह तब्बल १० इच्छूकांनी तयारी दाखविली. त्यानंतर निवडणूक अधिकार्‍यांनी माघारीचे आवाहन केले असता, १० इच्छुकांनी माघारी घेतली. या माघारीनंतर इच्छुकांची मनधरणी करून ७ इच्छुकांची माघारी झाली. १७ इच्छुकांनी माघार घेतल्यामुळे आहेर यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी खासदार डॉ. भारती पवार, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार डॉ. राहूल आहेर, माजी जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, जिल्हा परिषद गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे, जिल्हा परिषद सदस्य मनीषा पवार, मालेगाव जिल्हाध्यक्ष सुरेश निकम व जिल्ह्यातील सर्व मंडळ अधिकारी, बुथप्रमुख, शाखाप्रमुख उपस्थित होते.

केदा आहेर यांनी यापूर्वी भाजयुमोे जिल्हाध्यक्षपद भूषवलेले असून, जिल्हा परिषदेत संख्याबळ कमी असतानासुद्धा सभापतीपद मिळवून त्यांनी आपली राजकीय परिपक्वता दाखवून दिली होती. त्यानंतर जिल्हा बँक अध्यक्षपद व देवळा बाजार समिती सभापती म्हणून ते सध्या कार्यरत आहे. भाजपचा एक आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत उभे राहील, या दृष्टिकोनातून त्यांना जिल्हाध्यक्षपद बहाल केले. भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्याचा मानसन्मान केला जाईल. तसेच, महाराष्ट्रात एक उत्तम प्रकारचे पक्ष संघटन म्हणून नाशिक जिल्ह्याचा नावलौकिक होईल, असे काम उभे करण्याचा संकल्प केदा आहेर यांनी यावेळी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -