Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र नाशिक शहर खड्डेमुक्त करा अन्यथा... शिवसैनिक आक्रमक; 'आपलं महानगर'चे संपादकीय दिले भेट

शहर खड्डेमुक्त करा अन्यथा… शिवसैनिक आक्रमक; ‘आपलं महानगर’चे संपादकीय दिले भेट

Subscribe

नाशिक : शहरातील खड्ड्यांची त्वरीत दुरुस्ती करण्यात येऊन नाशिककरांना त्रासमुक्त करावे अन्यथा शिवसेनास्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या (उबाठा) इंदिरानगर शाखेने नाशिक महापालिकेला दिला आहे. यासंबंधीचे निवेदन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त चौधरी यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटल्याप्रमाणे, पावसामुळे शहरातील इंदिरानगर, सिडको, पंचवटी, नाशिकरोड भागांत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. मणक्यांचे त्रास, मानेला झटके यामुळे नाशिककर त्रस्त झाले आहेत. यातुन नाशिककरांना मुक्त करण्यासाठी शहरातील खड्डे त्वरीत बुजविण्यात यावे अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी विधानसभा मध्य नाशिक प्रमुख बाळासाहेब कोकणे, विधानसभा संघटक ऋषिकेश वर्मा, उपमहानगर संघटक इम्रान तांबोळी, विभाग प्रमुख आतिष जाधव, विभाग संघटक पंकज कराडे, उपविभाग प्रमुख कैलास जाधव, प्रभाग प्रमुख राहुल बाबर, उपविभाग प्रमुख वसीम सय्यद, नरेश काकड, सचिन मंडलिक, विवेक सूर्यवंशी, अजित चौधरी, रोनित पारख, दिनेश कुमावत, हर्षल चौधरी, हेमंत मेधने, यशवंत बोंडे आदी हजर होते.

- Advertisement -

हे होते संपादकीय : रस्त्यांना खड्डे, हे तर भ्रष्टाचाराचे अड्डे!

दै. आपलं महानगरचे निवासी संपादक हेमंत भोसले यांचे संपादकीय आयुक्तांना भेट

दैनिक आपलं महानगरचे निवासी संपादक हेमंत भोसले यांनी 2 आॅगस्टच्या अंकात रस्त्यांना खड्डे, हे तर भ्रष्टाचाराचे अड्डे या शिर्षकाखाली संपादकीय लिहिले आहे. यामध्ये खड्डयांमधून अर्थकारण कसे साध्य करण्यात येते, रस्ते तयार करण्याचे शास्त्रशुध्द तंत्र कसे आहे याविषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे. या संपादकीयची कॉपी यावेळी शिवसेनेच्यावतीने अतिरिक्त आयुक्तांना अवलोकनार्थ देण्यात आली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -