घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकंपनीचे लॉक बनावट चावीने उघडून साहित्य चोरी

कंपनीचे लॉक बनावट चावीने उघडून साहित्य चोरी

Subscribe

अंबड औद्योगिक वसाहतीतील बंद कंपनीचे लॉक बनावट चावीने उघडून चोरट्यांनी कंपनीतील ८९ हजारांचे साहित्य चोरून नेले. उमेश राजाराम दुंडगे (रा. महात्मानगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची ल्युबटेक ऑईल ही कंपनी असून, ३१ मार्च रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीने कंपनीचे लॉक उघडून कंपनीतील चार फिल्टर प्लेट, दोन डायामीटरचे पाईप, स्पॅनर बॉक्स, सी चॅनल, गेअर पंप, मोटार असे ८९ हजारांचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी अंबड पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

नाशिकरोड रेल्वे स्टेशनच्या आवारातून दुचाकी लंपास

नाशिकरोड परिसरातील रेल्वे स्टेशन पोलीस चौकीच्या मागे पार्क केलेली २० हजारांची स्प्लेंडर दुचाकी (एमएच १५ इजे २३५३) चोरट्याने चोरून नेली. संजय हिराजी हिंगोले (रा. मोरवाडी गाव, सिडको) यांची दुचाकी रविवारी (दि. ७) दुपारी एक वाजता चोरीला गेली. तर, हसिन आबिद खान (रा. नांदूर नाका) यांची २५ हजारांची स्प्लेंडर दुचाकी (एमएच १५ इएफ ८२३१) रविवारी (ता. ७) दुपारी साडेतीनच्या सुमरास दसक घाट येथून चोरीला गेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

महागडी सायकलची चोरी

पेठरोडवरील कुमावत नगरमधील सोसायटीच्या पार्किंगमधून ५ हजारांची सायकल चोरट्याने चोरून नेली. धनंजय शंकर गाढवे (रा. गोकूळधाम सोसायटी, कुमावतनगर) यांची फिर्यादीनुसार, शनिवारी (ता. ६) मध्यरात्री त्यांची सायकर चोरीला गेली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बसस्टॉपजवळ लॅपटॉप लंपास

तपोवनातील आडगाव नाक्याजवळ असलेल्या बसस्टॉपजवळ युवकाचा ३० हजारांचा लॅपटॉप अज्ञात चोरटयाने लंपास केला. विलास दिलीप महाजन (रा. श्रीरामनगर, आडगाव शिवार) यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता. ७) सायंकाळी सहा ते पावणे आठ वाजेच्या दरम्यान सदरचा प्रकार घडला. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -