घरक्राइमशहरात सर्वाधिक ११६ अपघात रात्री ८ ते १२ दरम्यान; सर्वात कमी ३५...

शहरात सर्वाधिक ११६ अपघात रात्री ८ ते १२ दरम्यान; सर्वात कमी ३५ मध्यरात्री

Subscribe

नाशिक : शहरात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, जानेवारी ते ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत तब्बल ३९१ अपघात झाले आहेत. विशेष म्हणजे, सर्वाधिक अपघात रात्री ८ ते मध्यरात्रीदरम्यान ११६ झाले आहे. इतर अपघात सायंकाळी ४ ते रात्री ८ वाजेदरम्यान ८१, सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ५७, दुपारी ४ ते रात्री ८ वाजेदरम्यान ५९ अपघात झाल्याचे समोर आले आहे. मध्यरात्री पासून ते पहाटे चार वाजेपर्यंत अपघाताची संख्या सर्वाधिक कमी आहे. या काळात अपघातांची सर्वात कमी संख्या म्हणजे 35 एवढी आहे.

नाशिक शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अपघात वाढले आहेत. दिवसेंदिवस अपघाती मृत्यूच्या संख्येतही वाढ हात आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी सर्वेक्षण केले. त्यात दुपारी 4 ते संध्याकाळी 8 या वेळात अपघात जास्त होत असून रात्री 8 ते बारा ही वेळ मृत्यूची असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. कामावरून घरी परतणारे, कंपनीतून घरी परतणारे, चुकीच्या मार्गाने गाडी चालविणारे, दारू पिऊन गाडी चालविणे यामुळं सर्वाधिक अपघात असल्याची कारणे आहेत. अपघात रोखण्यासाठी शहर पोलिसांनी रस्ते अपघातांचे विश्लेषण केले आहे. दिवसा होणार्‍या अपघातांची पोलिसांनी सहा तासांच्या स्लॉटमध्ये विभागणी केली. त्यानुसार असे आढळून आले की सर्वाधिक अपघात रात्री 8 ते मध्यरात्री दरम्यान झाले आहेत, त्यानंतर 4 ते 8 च्या स्लॉटमध्ये आहेत. पोलिसांनी सांगितले की, संध्याकाळी 4 ते 8 ही शहरातील रस्त्यांवरील वाहतुकीची सर्वाधिक वेळ असते . रॅश ड्रायव्हिंग रात्री 8 नंतर सुरू होते. रात्री 8 नंतर, रस्त्यावर वाहनांची संख्या कमी होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -