घरताज्या घडामोडीगोवा-मुंबई बस प्रवासात 22 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; विचित्र घटनेने पोलिसांमध्ये गोंधळ

गोवा-मुंबई बस प्रवासात 22 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; विचित्र घटनेने पोलिसांमध्ये गोंधळ

Subscribe

गोव्याहून मुंबईला बसने जात असताना एका 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. गोवा-मुंबई बस प्रवासादरम्यान तरुणीच्या छातीत दुखू लागल्याने तिच्यासोबत असलेल्या मित्राने बस रुग्णालयात नेण्यास सांगितले.

गोव्याहून मुंबईला बसने जात असताना एका 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. गोवा-मुंबई बस प्रवासादरम्यान तरुणीच्या छातीत दुखू लागल्याने तिच्यासोबत असलेल्या मित्राने बस रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र बसच्या चालक-वाहकाने बस रुग्णालयात न नेता मारहाण केल्याचा आरोप मृत तरुणीच्या मित्रानी केला. याप्रकरणी नेरूळ पोलिसांनी चालक आणि वाहकाला अटक केली. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. (Death Of Girl In Goa To Mumbai Bus Nerul Police)

नेमके प्रकरण काय?

- Advertisement -

मुंबईच्या मालाडमधील मालवणी येथे राहणारी 22 वर्षीय तमिना गोव्यातील बागा येथे असलेल्या बारमध्ये काम करत होती. शुक्रवारी तिला स्कूटर चालवत असताना अपघात झाल्याने तिला दुखापत झाली होती. त्यामुळे तिची आई सरूप यांनी तिला मुंबईला येण्यास सांगितले. त्यावेळी मुंबईला येण्यासाठी तमिना तिच्या मित्रासोबत निघाली होती.

गोव्याहून मुंबईला परतण्यासाठी तमिनाने शनिवारी रात्री १० वाजता गोव्यातील मापसा मार्केट परिसरातून ‘आत्माराम ट्रॅव्हल्स’ची बस पकडली. बसमध्ये बसल्यावर काही तासानंतर तमिनाला पोटदुखीचा त्रास झाला. पोटात दुखत असल्याने ती काहीच खात नव्हती. त्यामुळे सचिनने तिच्या आईला फोन केला. त्यावेळी तिने तमिनाला चहा देण्यास सांगितले. त्यानंतर रविवारी सकाळी ९:४५ वाजताच्या सुमारास बस साताऱ्यात थांबली. त्यावेळी सचिन हॉटेलमधून चहा घेण्यास खाली उतरला. तो पुन्हा बसमध्ये गेला. तेव्हा त्याला बसचा वाहक योगेश तमिनाला सीपीआर देताना दिसला.

- Advertisement -

त्यावेळी तमिनाच्या मित्राने वाहक योगेशला बस रुग्णालयात नेण्यास सांगितली. त्यावेळी त्या योगेश नामक वाहकाने त्याच्या कानशिलात मारली आणि चालकाच्या केबिनमध्ये बसवले. त्यानंतर तुझ्यामुळे तिला त्रास झाल्याचे त्या वाहकाने सांगितले. तसेच, बस पोलीस ठाण्याला नेणार असल्याचे सांगितले. त्यानुसार, बस चालकाने बस नेरुळ पोलीस ठाण्यामध्ये नेली, अशी माहिती तमिनाच्या मित्राने दिली.

बस नेरुळ पोलीस ठाण्यात थांबवल्यानंतर तमिनाला तिच्या मित्राने वाशीतील एनएमएमसी रुग्णालयात नेले. त्यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, असेही यावेळी तमिनाच्या मित्राने सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

दरम्यान, या प्रकरणाचा पोलिसांनी अधिक तपास केला असता गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, तरुणीच्या मृत्यूनंतर सोमवारी शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी मृत्यूचे प्राथमिक कारण डोक्याला झालेली दुखापत असल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालातून समोर आले.


हेही वाचा – एक दुबळं, मानसिक दृष्ट्या अपंग सरकार राज्यात बसलंय; संजय राऊतांची टीका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -