घरक्राइमचांदवडच्या राहुड घाटात बर्निंग टेम्पो ट्रॅ्रव्हलरचा थरार

चांदवडच्या राहुड घाटात बर्निंग टेम्पो ट्रॅ्रव्हलरचा थरार

Subscribe

चांदवड : मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाटात सोमवारी (दि.२८) सकाळी ११.३० वाजेदरम्यान चालत्या टेम्पो ट्रॅव्हल्सने पेट घेतले. या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी टेम्पो जळून खाक झाला. ही आग इलेक्ट्रिक शॉटसर्किट लागून झाली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक तीनवर सोमवारी (दि.२८) दुपारी ११.३० वाजेच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हल्स (एमएच 15 सीव्ही 5188) चांदवडकडून मालेगावकडे जात होती. टेम्पो चांदवड तालुक्यातील राहुड शिवारात आला. त्यावेळी टेम्पोमध्ये इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाला. त्यात टेम्पोला आग लागली. या आगीत टेम्पो जळून खाक झाला. आगीमुळे महामार्गावर बघ्यांची गर्दी झाली होती. आगीची माहिती मिळताच सोमा टोल कंपनी येथील अग्निशामक दलाच्या गाडीला प्राचारण करून आग विझवण्यात आली. सुदैवाने आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही, असे टेम्पो ट्रॅव्हल्स चे ड्रायव्हर असंतोष बाळासाहेब सानप (वय 33, रा. पंचवटी, नाशिक) यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -