घरमहाराष्ट्रनाशिकम्युकरमायकोसिसच्या गैरसमजातून झाडांचा नाहक बळी

म्युकरमायकोसिसच्या गैरसमजातून झाडांचा नाहक बळी

Subscribe

बुरशी लागलेल्या झाडांची कत्तल; नेचर क्लबतर्फे जागृती

कोरोनाचे रुग्ण बरे झाल्यानंतर त्यातील अनेकांना बुरशीजन्य आजारांशी सामना करावा लागत आहे. मात्र कोणत्याही बुरशीमुळे हा आजार होत असल्याचा गैरसमज निर्माण झाल्याने बुरशी आलेली झाडेही तोडण्यासाठी आता लोक पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर नेचर क्लब ऑफ नाशिक संस्थेने झाडांवर फलक लावून यासंदर्भात जनजागृती केली.
काही दिवसांपासून काळी बुरशी किंवा म्यूकोमायकोसिस देशात थैमान घालू पाहतोय. मागील वर्षीदेखील काळ्या बुरशीच्या संसर्गाची अनेक प्रकरणे समोर आली होती आणि यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. काळ्या बुरशीच्या तक्रारी सहसा कोविड झाल्या नंतर केल्या जातात. असा आजार हा बुरशी पासून होत असल्याने नागरिकांनी थेट याचा संबंध वृक्षांशी जोडत वृक्षांमुळे हा आजार बळावतोय अशी अफवा सध्या शहरात पसरली आहे. वृक्षावर कोणतीही किड दिसल्यास तिला काळी बुरशी समजून वृक्षच तोडण्याचा प्रयत्न केला
जात आहे.
नाशिकमध्ये पर्यावरणावर काम करणार्‍या नेचर क्लब ऑफ नाशिक कडे अनेक दूरध्वनी आल्यावर संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ताबडतोब जनजागृती अभियान सुरु करून प्रत्यक्ष त्या ठिकाणी जावून वृक्षांचे महत्व समजावून सांगितले. फलक लावून वृक्ष न तोडण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. वृक्षांमध्ये बुरशी निर्माण होते म्हणून वृक्षच तोडून टाकणे चुकीचे आहे. बुरशी आल्यास कडूलिंब तेलाची फवारणी केल्यास बुरशी कमी होण्यास मदत होते. या अभियानात संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, सागर बनकर, अपूर्व नेरकर, आशिष बनकर, नितेश पिंगळे, आकाश जाधव आदी सहभागी झाले होते.

 

- Advertisement -

वनस्पतींमध्ये बुरशीजन्य आजार सामान्य
कोणत्याही वृक्षावर कोणती ना कोणती किड आणि बुरशी येत असते. म्हणून ते झाडच तोडण्याचा निर्णय अंगाशी येऊ शकतो. यावर पर्याय म्हणजे संबंधित झाडावर फवारणी करणे. अनेक वृक्ष हे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देण्याचे काम करीत असताना त्यांनाच दोषी ठरविणे चुकीचे आहे. वनस्पतींमध्ये बुरशीजन्य आजार सामान्य आहेत. त्यापैकी अगदी लहानसे अंश मानवांना त्रास देतात. या आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन नेचर क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -