घरमहाराष्ट्र'राजकारण चंचल नसतं, शिवसेनेची विचारधारा चंचल झालीये'; दरेकरांचा राऊतांना टोला

‘राजकारण चंचल नसतं, शिवसेनेची विचारधारा चंचल झालीये’; दरेकरांचा राऊतांना टोला

Subscribe

राजकारण कधीच चंचल नसतं, राजकीय नेते चंचल असतात आणि शिवसेनेची विचारधारा देखील तशीच चंचल झाली आहे, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी राजकारण चंचल असून कधीही काहीही घडू शकते. कोणीही कोणासोबत जाऊ शकते, असं भाष्य केलं. यावर प्रतिक्रिया देताना दरेकरांनी टोला लगावला.

प्रवीण दरेकर यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत बोलतात त्याप्रमाणे राजकारणात घडत नाही. राजकारण कधीच चंचल नसते, राजकीय नेते हे चंचल असतात. पण आपली वैचारिक भूमिका आणि विचारधारा ही चंचल नसावी. शिवसेनेच्याबाबतीत ही गोष्ट घडत आहे. संजय राऊत यांनी त्याचा विचार करावा, असा सल्ला देखील दरेकरांनी दिला. पुढे बोलताना त्यांनी शिवसेनेला पाच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा आहेत. मात्र, अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा कधीही लपून राहिलेली नाही, याकडेही प्रविण दरेकर यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

राजकारण हे चंचल, कोणालाही मुठीत ठेवायला जमलं नाही

राजकारण हे चंचल असतं, ते कोणालाही ते मुठीत ठेवणं जमलं नाही. ते आतापर्यंत नेहरुंना ताब्यात ठेवता आलं नाही, इंदिरा गांधींनाही ते आपल्या मुठीत ठेवता आलं नाही. त्यानंतरच्या वाजपेयींनाही हे शक्य झालं नाही. त्यामुळे कोणी कायम राजकारणात सत्तेत राहिल असं नाही असा टोला संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि भाजपला लगावला आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -