घरक्राइम७ महिन्यांच्या मुलीला सोडून पळाली माता; पोलिसांकडून एक तासात शोध

७ महिन्यांच्या मुलीला सोडून पळाली माता; पोलिसांकडून एक तासात शोध

Subscribe

संतापजनक : भिकारी महिलेच्या सतर्कतेने ’नकोशी’ पुन्हा आईच्या ताब्यात; जिल्हा रुग्णालयातील बाल कक्षात उपचार सुरू

नाशिक : ‘माता न तू वैरिणी’ असं म्हणण्याची वेळ मंगळवारी दुपारच्या घटनेत आल्याने अनेकांचं काळीज हेलावलं. आपल्या पोटच्या अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुकलीला जन्मदात्या आईनेच एका भिकारी महिलेकडे सोडून तेथून पळ काढळ्याची संतापजनक घटना शहराच्या मध्यवर्ती अन् वर्दळीच्या भागात घडली. दुपारी 12 वाजेच्या दरम्यान घडलेल्या या थरारनाट्यात सीबीएस बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची मोठी मदत झाली आणि सरकारवाडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने या मातेला ताब्यात घेत मुलीला चाईल्ड लाईनकडे सोपवले. मात्र, प्रकृती काहीशी खालावल्याने या चिमुकलीला जिल्हा रुग्णालयाच्या बाल कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या ‘नकोशा’ घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी (दि. १४) दुपारी १२ वाजेच्या सुमारास सीबीएस बसस्थानकात बसणार्‍या एका भिकारी महिलेजवळ लहान मुलगी सोडून एक माता पळून गेली. ही गोष्ट येथील नागरिकांच्या आणि या भिकारी महिलेच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने चाईल्ड लाईनला कळवले. चाईल्ड लाईनच्या पथकाने सरकारवाडा पोलिसांना कळवले आणि दोघांचीही पथके काही मिनिटांत याठिकाणी दाखल झाली. यानंतर संबंधित महिलेला या चिमुकलीविषयी विचारणा केली असता एक महिला तिला याठिकाणी सोडून बोलण्याच्या नादात गुंगवून पळून गेल्याचे तिने सांगितले. त्यानुसार सरकारवाडा पोलिसांनी बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यानुसार संबंधित भिकारी महिला खरे बोलल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा कॅमेर्‍यात दिसल्याप्रमाणे शोध घेतला असता ही महिला अशोक स्तंभाच्या दिशेने गेल्याचे दिसून आले. तेव्हा तिच्या वर्णनाच्या आधारे पथकाने पंचवटीकडे जाणार्‍या प्रमुख रस्त्यांवर शोध घेत तेथील सीसीटीव्ही तपासले असता काही वेळात ही महिला पंचवटी परिसरात मिळून आली. पोलिसांनी तिला मुलीबाबत विचारले असता सुरुवातीला तिने चुकीची माहिती दिली, मात्र, पोलिसांच्या धाकापुढे तिने अखेर आपल्या पोटच्या मुलीला सीबीएस बसस्थानकातील महिलेकडे सोडून पळाल्याची कबुली दिली.

- Advertisement -

सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र कोल्हे यांच्या पथकाने अवघ्या एका तासात या मुलीच्या आईचा शोध घेतल्याने या चिमुकलीला पुन्हा तिच्या आईचा ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, सरकारवाडा पोलिसांनी संबंधित महिलेची विचारपूस केली तेव्हा सुरुवातीला तिने साहित्य खरेदीसाठी जायचे असल्याने आणि जास्त ओझे असल्याने मुलीला त्याठिकाणी ठेवल्याचे मोहघम उत्तर दिले. मात्र, नंतर तिने आपली चूक कबुल केली. पोलिसांनी माणुसकी म्हणून तिला केवळ ताकिद देत सोडले. मात्र, असे कृत्य पुन्हा केल्यास गुन्हा दाखल करून कडक शासन करू, असा सज्ज्ड इशाराही दिला. पोलिसांच्या या कार्यतत्परतेने, तसेच चाईल्ड लाईन आणि संबंधित भिकारी महिलेच्या प्रसंगावधानतेमुळे चिमुकलीला अखेर तिच्या जन्मदात्रीची कूस पुन्हा मिळाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -