घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा

नाशिकमध्ये गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा

Subscribe

दरवाढीविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून निषेध

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिक होरपळून निघाले असताना, गॅस दरवाढीने यात तेल ओतलंय. कोरोनामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्यांना या दरवाढीने संकटात लोटलं असल्याचा आरोप राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं करण्यात आला.

सिन्नर फाटा येथे करण्यात आलेल्या या आंदोलनाप्रसंगी केंद्र सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोदी तेरे राज मे, जनता बुरे हाल मे, केंद्र सरकार हाय हाय, मोदीजी का देखो खेल महंगा सिलेंडर, महंगा तेल, बहोत हुई महंगाई की मार, बस करो मोदी सरकार अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला यावेळी गॅस सिलेंडरचे भाव वाढल्याने गॅस सिलेंडरची तिरडी काढून महिलांनी निषेध व्यक्त केला. गॅस दरवाढ थांबली नाही तर महिलांवर आत्महत्येची वेळ येईल. पुन्हा गॅसदर वाढवले तर सर्वसामान्यांची तिरडी केंद्र सरकारने काढावी अशी चेतावनी जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी सरकारला दिली. कोरोनाकाळात आर्थिक स्थिती मंदावली असतांना सरकार दरवाढ करून सर्व सामान्य जनतेची गळचेपी करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी गायत्री झांजरे , रुबिना खान, स्वाती मोरे, राधा जाधव, सुलताना शेख,पद्संगिता उमाप, मनिषा झांजरे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -