घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रदेशाच्या स्थितीबाबत राष्ट्रवादीचे शिर्डीत मंथन; भविष्याचाही घेणार वेध

देशाच्या स्थितीबाबत राष्ट्रवादीचे शिर्डीत मंथन; भविष्याचाही घेणार वेध

Subscribe

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने येत्या ४ व ५ नोव्हेंबरला शिर्डीत मंथन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी ‘मंथन: वेध भविष्याचा’ असे या शिबीराला नाव देण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील विचारवंत व अभ्यासक मार्गदर्शन करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, अ‍ॅड. रविंद्र पगार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रवादी भवन येथे आयोजीत या पत्रकार परिषदेप्रसंगी जिल्हाध्यक्ष आव्हाड म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारणार्‍या या शिबिरात २०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुका तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांची मनोभूमिका बळकट करण्यात येणार आहे. तसेच हुकूमशाहीकडे वाटचाल करणार्‍या देशातील वर्तमान स्थितीचे कार्यकर्त्यांना आकलन व्हावे, भावी राजकीय व अन्य आव्हानांसाठी त्यांना सज्ज करणे हा मंथन शिबिराचा उद्देश आहे. देशातील वर्तमानस्थिती बिकट असून भविष्य अनिश्चित आहे. शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग करून दडपशाहीद्वारे विरोधकांची मुस्कटदाबी करण्यात येत आहे. महागाई, बेरोजगारी, रुपया अवमूल्यन, ढासळती अर्थव्यवस्था याने कळस गाठला आहे. अवाजवी धार्मिक मुद्दे उपस्थित करून या गंभीर मुद्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व मुददयांवर चर्चा करण्यात येउन भविष्यातील पक्षाची रणनिती ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -