घरमहाराष्ट्रनाशिकजय किसान फार्मर्स फोरमतर्फे शेतकरी सन्मान

जय किसान फार्मर्स फोरमतर्फे शेतकरी सन्मान

Subscribe

भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त बुधवारी ११ एप्रिलला येथील परशुराम साईखेडकर नाट्यगृहात विविध कार्यक्रम पार पडले.

भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त बुधवारी ११ एप्रिलला येथील परशुराम साईखेडकर नाट्यगृहात विविध कार्यक्रम पार पडले. यात प्रयोगशील शेतकर्‍यांना ‘कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख कृषी गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच ‘विषमुक्त सेंद्रिय शेती’ या विषयावर परिसंवाद झाला.

व्यासपीठावर श्री श्री १००८ महंत आयुर्वेदाचार्य स्वामी माधवानंदजी सरस्वती महाराज, ब्रिगेडीयर सुधीर सावंत, ‘इफको’च्या संचालक साधना जाधव, ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. जयराम पूरकर, आरक्षणाचे अभ्यासक डॉ. बाळासाहेब सराटे, निवृत्त कृषी उपसंचालक डॉ. मंगेश देशमुख, जय किसान फार्मर्स फोरमचे अध्यक्ष संजय जाधव, सेंद्रियतज्ज्ञ सदूभाऊ शेळके, कृषितज्ज्ञ दत्तात्रय ढिकले, प्रयोगशील शेतकरी गणेश निसाळ, कर्नल देवीदास पोरजे, कृषी उद्योजक पांडुरंग चव्हाण, एकनाथ गवांदे उपस्थित होते.

- Advertisement -

प्रमुख पाहुणे सराटे म्हणाले की, शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेती आणि शेतकरी संकटात सापडला आहे. नैसर्गिक आपत्ती, वाढता उत्पादन खर्च, मजुरटंचाई यामुळे शेती व्यवसाय हा आतबट्ट्याचा व्यवसाय बनला आहे. शेतीतून शेतीपूरक व्यवसाय, अन्य व्यवसाय व नोकरीकडे वळणे हाच पर्याय शेतकर्‍यांना उरला आहे. शेतकरी विरोधात आमुलाग्र बदल झाला तरच शेतीचे चित्र बदलू शकेल. साधना जाधव यांनी प्रास्ताविक केले. रसायनांच्या अतिवापराने मानवी आरोग्याच्या समस्या गंभीर बनल्या आहेत. सेंद्रिय शेतीही काळाची गरज आहे. असा सूर ‘विषमुक्त सेंद्रिय शेती’ या परिसंवादात उमटला. सुरेश सलादे व रेखा महाजन यांनी सूत्रसंचालन केले.

यांचा झाला सन्मान

मनोज जाधव-सय्यदपिंप्री, संजय बच्छाव-सायखेडा, प्रकाश कुरणे-देवरगाव, बापुराव गुंजाळ-गुंजाळनगर, शिवाजी ठाकरे- उर्धुळ, महेश व तेजस्विनी पवार, आैंदाणे, रमेश व अरुणा पाटील, हिम्मत व ज्योती महाले, लक्ष्मण सूळ, प्रकाश आहेर, काशिनाथ व संगिता गुंजाळ, शिवाजी डोखळे, चेतन निकम, जितेंद्र पवार, दौलत शिंदे, योगेश पवार, अश्वीनभाई व प्रभा बेहेन कंझारिया, दिपक व कोमल जाधव, संजय व मनिषा महाजन, अशोक व मनिषा शिंदे, राजाराम व भारती खैरनार, कृष्णा व सगुणाबाई रौंदळ, कैलास व लक्ष्मीबाई पगार, योगेश ढोमसे, कैलास मोरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -