घरमहाराष्ट्रनाशिकलस नाही तर दर्शन नाही, सप्तश्रृंगी मंदिर ट्रस्टचा निर्णय

लस नाही तर दर्शन नाही, सप्तश्रृंगी मंदिर ट्रस्टचा निर्णय

Subscribe

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर खबदारी, ६५ वर्षावरील ज्येष्ठांना मंदिरात प्रवेश नाही

नाशिक : कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिकसह राज्यात रूग्णसंख्या झपाटयाने वाढत असल्याने राज्यभरातील भाविकांचे आराध्य दैवत असणार्‍या वणी येथील सप्तश्रृंगी मंदिरात भाविकांना लस घेतल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.

वणी येथील सप्तश्रृंगी मंदिराच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येतात. मात्र, येथे वाढणारी गर्दी आणि कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण पाहता कोरोना नियमांचा विसर पडून संसर्गाचा धोका अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सतर्क झाले आहे. यापार्श्वभुमीवर कोरोना लसीचा किमान एक डोस घेतल्याशिवाय आता भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच 10 पेक्षा कमी आणि 65 पेक्षा अधिक वयाच्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्णयही घेण्यात आला आहे. शिवाय मंदिरातील गर्दी टाळण्यासाठी ई पास आणि ऑनलाईन दर्शनाचा लाभ भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. यापूर्वी नवरात्रोत्सव आणि कोजागरी पौर्णिमेच्या काळातही नियम कडक करण्यात आले होते.

- Advertisement -

 

अशी आहे नियमावली

  • किमान १ डोस पुर्ण केलेल्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश.
  • १० वर्षापेक्षा कमी, ६५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या ग्रामस्थांना प्रवेश बंद.
  • कोरोना त्रिसुत्रीचे पालन बंधनकारक.
  • मास्क लावणे, सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर अनिवार्य.
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -