घरट्रेंडिंगसावधान ! 'Google Chrome'वर लॉगिन आयडी,पासवर्ड Save करताय? असं होईल तुमचं...

सावधान ! ‘Google Chrome’वर लॉगिन आयडी,पासवर्ड Save करताय? असं होईल तुमचं अकाउंट हॅक

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगभरात सायबर क्राइमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.जर तुम्हीसुद्धा इंटरनेटचा वापर करत असाल आणि त्यात गुगल क्रॉमचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

हल्ली अन्न,वस्त्र आणि निवाऱ्यानंतर मुलभूत गरज झाली आहे ती सोशल मिडियाची. या डिजीटल युगात जसे फायदे आहेत,त्याचप्रमाणे तोटेदेखील आहेत. डिजिटल युगात अनेक गोष्टी या सोप्या होऊन, संपूर्ण जग जवळ आले आहे. मात्र या डिजिटल युगात थोड्या फार प्रमाणातील हलगर्जीपणासुद्धा तुम्हाला त्रासदायक ठरु शकतो.गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगभरात सायबर क्राइमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सायबर गुन्हेगार हे अशा लोकांच्या शोधात असतात जे लोक टेक्नोसेवी नसतात. जे डिजिटल गोष्टींचा वापर करण्यास फारसे सक्षम नसतात, अशा गुगल क्रोम वापरकर्त्यांचा फायदा घेण्यासाठी हे सायबर गुन्हेगार टपून असतात.जर तुम्हीसुद्धा इंटरनेटचा वापर करत असाल आणि त्यात गुगल क्रॉमचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. तुम्हीही तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड गुगल क्रोमवर सेव्ह करत असाल तर, भविष्यात तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

गुगल क्रोम वापरताना अनेकदा बरेचजण लॉगिन आयडी आणि पासवर्ड त्यावर सेव्ह करुन ठेवतात.नुकतच काही आयटी कंपन्यानी घरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी इशारा दिला आहे की, गुगल क्रोमवर सेव्ह होणारे तुमचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड हॅक होऊ शकतात. याशिवाय तुमचा खाजगी डेटा आणि तुमच्या कंपनीचाही डेटा लीक होण्याचा धोका असतो.

- Advertisement -

…नाहीतर, तुम्हीही सायबर क्राइमच्या विळख्यात अडकू शकता.

काही काळापूर्वी सुरक्षेच्या उल्लंघनामुळे एका कंपनीचा डेटा लीक झाला आहे.त्यामुळे कंपनीलाही मोठा तोटा होऊ शकतो. अँटीव्हायरस सॉफ्टवेअरदेखील या हल्ल्यांपासून तुमचा बचाव करु शकत नाही. त्यामुळे ब्राउझरवर तुमचा लॉगिन आयडी कधीही सेव्ह करु नका. याशिवाय या सायबर क्राइमच्या विळख्यात न अडकण्यासाठी अधिकृत अॅप्सचा वापर करा. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळा. काही अविश्वसनीय लिंकवर क्लिक केल्यावर तुमच्या डिव्हाइसमध्ये व्हायरस किंवा कोणत्याही प्रकारचा सायबर हल्ला होण्याची शक्यता आहे.

‘इथे’ लॉगिन आयडी आणि पासवर्ड सेफ ठेवू शकता.

याशिवाय गुगल क्रोममध्ये गेल्यावर डाव्या कोपऱ्यात तीन उभ्या डॉटवर क्लिक करा. त्यात ‘New Incognito Window’ यावर क्लिक करुन तुम्ही तुमचे सोशल मिडिया अकाउंट, लॉगिन आयडी आणि पासवर्ड सेफ ठेवू शकता.

- Advertisement -

हे ही वाचा – राज्य निवडणूक आयोगाने आगामी निवडणुका ओबीसींविना घेऊ नये, बावनकुळेंची सुप्रीम कोर्टात धाव


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -