घरमहाराष्ट्रनाशिकएक बॅनरवर भुजबळ तर दुसर्‍यावर गायब

एक बॅनरवर भुजबळ तर दुसर्‍यावर गायब

Subscribe

नांदगाव राष्ट्रवादीचा अजब कारभार; कार्यकर्ते संभ्रमात

आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे. आगामी निवडणुकीत शिवसेना, भाजप युती होणार की नाही, याकडे इच्छुकांसह सर्वांचेच लक्ष लागलेले असताना भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेने निवडणूक वातावरण अधिकच रंगतदार झाली आहे. नांदगाव येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या संवाद यात्रेनिमित्त लावलेल्या काही बॅनर्सवर भुजबळ गायब; तर काही बॅनर्स शरद पवारांबरोबर छगन भुजबळांचा फोटो दिसला. तर व्यासपीठावर आमदार पंकज भुजबळ उपस्थित राहिल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे व सचिव आदेश बांदेकर यांच्या माऊली संवाद कार्यक्रमाव्दारे नांदगावला आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. यामुळे सहाजिकच युतीच्या कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, युती जोमात तर आघाडीमध्ये विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पदाधिकार्‍यांच्या पदांचे राजीनामे तर लादलेली पीए संस्कृतीमुळे कार्यकर्ते नाराज होऊन बैठका घेत आता ‘भुजबळ नकोच’चा नारा दिला गेला. तर आघाडीतीलच काँग्रेसनेही उमेदवार बदलावा किंबहूना नांदगाव विधानसभा मतदारसंघाची जागा पुन्हा काँग्रेसलाच मिळावी म्हणून मेळाव्यात एकमुखी मागणी केली.

- Advertisement -

एकंदरीत कार्यकर्त्यांमध्येच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यानिमित्ताने दोन मतप्रवाहाचे दर्शन घडलेले पहावयास मिळाले. खासदार सुळे येथील संवाद यात्रेचा कार्यक्रम आटोपवून चाळीसगावकडे निघाले असता श्री क्षेत्र नस्तनपूर येथील शनिदेवाच्या मंदिराला भेट दिली. त्यांच्या हस्ते आरतीही झाली. याप्रसंगी पक्षातील जुन्या व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. येथेही त्यांच्याकडे उमेदवार बदलून देण्याची मागणी केल्याचे समजते. एकंदरीत प्रकारामुळे आघाडी कोमात, असे चित्र मतदारसंघात निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे. भुजबळांना विरोध यावेळी प्रकर्षाने जाणवल्याने त्यांच्या अडचणी अधिकच वाढ होण्याची शक्यता येथे चर्चेली जावू लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -