घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रएकलहरे राख बंधार्‍यातील यंत्रसामुग्री बाहेर काढण्याचे आदेश

एकलहरे राख बंधार्‍यातील यंत्रसामुग्री बाहेर काढण्याचे आदेश

Subscribe

नाशिकरोड : महानिर्मिती कंपनीने एकलहरे औष्णिक केंद्राच्या राखेच्या बंधार्‍यातील राख उचलणे बंद करण्याचे आदेश काढल्यानंतर बंधार्‍यात मशिनरी टाकलेल्या राख व्यावसायिकांनी आपली यंत्रसामुग्री व वाहने बाहेर काढत अनामत रक्कम परत घेण्यासाठी अर्ज करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

कोराडी येथील खसाळा बंधारा फुटल्याने सुरक्षेच्या कारणास्तव एकलहरे बंधार्‍यातील राख उपसा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राखेच्या व्यवसायावरुन व साठवणुकीवरुन स्थानिक व बाहेरचे वाद निर्माण होऊन महसूल विभागावर मोर्चे काढण्यात आल्यानंतर महानिर्मिती कंपनीने गुरुवारी (दि.१८) कराराप्रमाणे एकलहरे बंधार्‍यात राख उपसा करण्यासाठी सुमारे २५ व्यावसायिकांनी महानिर्मिती कंपनीकडे भरलेले प्रत्येकी तीन लाख रुपये अनामत रक्कम भरलेली आहे. राख उपसा थांबल्याने महानिर्मिती कंपनीने सदर व्यावसायिकांना आपली यंत्रसामुग्री व वाहने बंधार्‍याच्या बाहेर काढण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचप्रमाणे अनामत रक्कम परत घेण्यासाठी कंपनीकडे अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून राखेचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. आता या आदेशांमुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -