घरमहाराष्ट्रनाशिकगणेशोत्सवासाठी पोलीस ' इन अ‍ॅक्शन मोड'

गणेशोत्सवासाठी पोलीस ‘ इन अ‍ॅक्शन मोड’

Subscribe

अतिरिक्त पोलीस महासंचालक सरंगल यांचे बैठक घेत परिक्षेत्रातील वरिष्ठ अधिकार्‍यांना मार्गदर्शन

नाशिक : कोरोनाचा प्रादूर्भाव ओसरल्याने यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सरकारने केले असल्याने गणेशमंडळांची संख्या वाढणार आहे. शिवाय, रायगड येथे बेवारस बोटीत शस्त्रसाठा आढळून आल्याने राज्यातील पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल यांनी नुकतीच नाशिक पोलीस आयुक्तालयासह परिक्षेत्रातील पोलीस आयुक्त आणि पाच जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांची बैठक घेत त्यांना मार्गदर्शन केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने दोन वर्षानंतर यंदा निर्बंधमुक्त वातावरणात गणरायाचे आगमन होत आहे. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी कायदा व सुव्यवस्था विभागाने राज्यातील सात परिक्षेत्रांसाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचा अधिकारी निरीक्षक म्हणून नेमला आहे. त्यानुसार नाशिकचे तत्कालीन पोलीस आयुक्त व वाहतूकचे अतिरीक्त पोलिस महासंचालक कुलवंत कुमार सरंगल यांच्याकडे नाशिक परिक्षेत्रची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सरंगल यांनी शनिवारी (दि.२०) पोलीस आयुक्तालयात आढावा बैठक घेतली. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जळगाव प्रवीण मुंढे, अहमदनगरचे मनोज पाटील, नंदूरबारचे पी. आर. पाटील आणि धुळ्याचे प्रवाणेकुमार पाटील यांच्या नाशिक शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त व सहायक पोलीस आयुक्त उपस्थित होते.

बैठकीतील सूचना 

  • दंगल नियंत्रण, जलद प्रतिसाद पथके सज्ज ठेवा.
  • नियमबाह्य गणेशोत्सव साजरा करणार्‍यांवर वॉच ठेवा.
  • सोशल मीडियावर नजर ठेवा. आक्षेपार्ह पोस्ट डिलीट करा.
  • परिक्षेत्रामधील पोलीस अधीक्षकांनी समन्यवय ठेवावा.
  • विशेष शाखा, गुप्तवार्ता विभागांच्या सूचनांकडे लक्ष द्या.
  • व्हीआयपी सुरक्षेचे पालन करा.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -