घरमहाराष्ट्रनाशिकतुफान हाणामारी पाहताच पोलिसांनी काढला पळ

तुफान हाणामारी पाहताच पोलिसांनी काढला पळ

Subscribe

गांधीनगर परिसरात जमिनीच्या वादातून दगडफेक आणि सशस्त्र हल्ल्यात दोन व्यक्ती जखमी

नाशिकरोड – गांधीनगर परिसरात जमिनीच्या वादातून दगडफेक आणि सशस्त्र हल्ल्यात दोन व्यक्ती जखमी झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, पोलिसांनी स्वतःच घटनास्थळावरून पळ काढल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. गांधीनगर भागातील टाकळी रोडवर असलेल्या अकबर इस्माईल शेख यांच्या कार्यालयाजवळ ही घटना घडली.

जगताप कुटुंबातील ७ व्यक्तींनी अकबर आणि अयाज शेख यांच्यावर सशस्त्र हल्ला केला. यात अकबर आणि अयाज हे दोघंही जखमी झाले. दरम्यान, या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज व्हायरल झाले असून, त्यात हाणामारी सुरू असताना दोन पोलीस कर्मचारी मोटरसायकलवरुन येताना दिसत आहेत. मात्र, या पोलिसांनी परिस्थिती पाहून काढता पाय घेतल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -