घरताज्या घडामोडीमाथेरानमध्ये सुरक्षा कठड्यांची सुरक्षा राम भरोसे!

माथेरानमध्ये सुरक्षा कठड्यांची सुरक्षा राम भरोसे!

Subscribe

रस्ताच वाहून गेल्याने एकूणच कामाचा दर्जा आणि नियोजनशून्य कामे चर्चेचा विषय ठरत आहेत.

सध्या नेरळ-माथेरान मिनी ट्रेन बंद असल्याने येथील घाट माथ्यावरचा प्रवास हा केवळ वाहनांवरच अवलंबून आहे. पर्यटनस्थळावर येणार्‍या पर्यटकांचा आणि स्थानिकांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी वर्षभरापूर्वी एमएमआरडीए अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून घाट रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम करण्यात आले. मात्र अतिवृष्टीच्या जोरदार तडाख्यामुळे रस्त्याला बांधण्यात आलेले सुरक्षा कठडे आणि रस्ताच वाहून गेल्याने एकूणच कामाचा दर्जा आणि नियोजनशून्य कामे चर्चेचा विषय ठरत आहेत.

या क्षेत्रात प्रतिवर्षी २०० इंचापेक्षा अधिक पाऊस पडतो. या दृष्टीने विकास कामे करताना संबंधित विभागाने विशेष खबरदारी घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र असे न होता कोट्यवधी रुपये खर्च करून करण्यात येणार्‍या कामांवर कोणाचाही अंकुश नसल्याने ठेकादार आणि अधिकारी यांच्या ‘अर्थ’पूर्ण युतीमुळे निकृष्ट दर्जाची कामे पहिल्याच पावसात रंग दाखवू लागल्याने या कामांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सदर रस्त्याच्या कामात डोंगर माथ्यावरून खळखळत येणार्‍या पाण्याच्या प्रवाहाला रस्त्या शेजारील गटारात जाण्यासाठी कुठेच मार्ग काढला नसल्यामुळे, तसेच गटारांमध्ये वाहून आलेल्या दगड, मातीचा गाळ तुडुंब भरल्याने पाण्याचा निचरा होत नसून परिणामी कुठे रस्ता, तर कुठे सुरक्षा रक्षक कठडे पावसात वाहून गेल्याने घाट रस्त्यातील प्रवास अतिशय धोकादायक झाला आहे.डोळ्यावर झापड लावलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अनागोंदी कारभारावर स्थानिकांकडून देखील नाराजी व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

ज्यावेळी नेरळ-माथेरान घाट रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले त्यावेळी प्रवासी वाहतूक करणार्‍या टॅक्सी संघटनेकडून वारंवार निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत .मात्र एमएमआरडीएने याची कोणतीही दखल घेतली नसून ठेकेदाराला अभयच दिले आहे. परिणामी रस्ता रूंदीकरणासाठी आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा चुराडा केला गेल्याची सर्वांचीच भावना आहे.

                                                                                                             -दिनेश सुतार 

- Advertisement -

हेही वाचा – जय जय रामकृष्ण हरी.., कर्जतचे रस्ते लईच भारी मनसेचे अनोखे टाळ नाद आंदोलन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -