घरमहाराष्ट्रनाशिकबनावट खत बनवणार्‍या कारखान्याचा पर्दाफाश

बनावट खत बनवणार्‍या कारखान्याचा पर्दाफाश

Subscribe

जिल्हा गुणवत्ता नियंत्रक विभागाने सत्यम अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज नावाच्या कंपनीवर धाड टाकत बनावट खत निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला.

निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील भेंडाळी येथे बनावट खत निर्माण करणार्‍या कारखान्याचा फर्दाफाश झाला असून जिल्हा गुणवत्ता नियंत्रक विभागाने सोमवारी (१३ मे) सत्यम अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज नावाच्या कंपनीवर धाड टाकत बनावट खत निर्मितीचा हा गैरप्रकार समोर आणला आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा धंदा सुरू होता.

सागर अ‍ॅग्रो इडंस्टीजचे व्यवस्थापक केशव मोहन बोरसे, मालक अशोक केशवराव पवार, अरूण पोपट उशीर यांच्या आधिपत्याखाली दहा- पंधरा कामगारांच्या देखरेखीखाली सुरू होता. स्फुरदयुक्त जैविक खताचा परवाना घेऊन खत निर्मिती होत होती. पंरतु, जैविक खत निर्मितीच्या नावाखाली बनावट खत निर्मिती सुरू होती. खत निर्मितीचा कुठलाही परवाना खत नियंत्रण विभागाकडून न घेता बोरसे व पवार यांनी चार- पाच प्रकारची रासायनिक व विद्राव्य खते बनवत. सुपर फॉस्फेट ७०, कॅल्शियम-सिलीकॉन, सम्राट पोटॅश दानेदार, बलवान सिलीकॉन तर प्रसाद मॅक्स पोटॅश हे खत भेडांळीत बनवत. यावर पत्ता एन .के. फॅटिलॉयजसॅ अ‍ॅड केमिकल, ओव्हीएचएच, ता. निफाड, जि. अहमदनगर, असा पत्ता टाकत. खुलेआम खतनिर्मिती करून शेतकर्‍यांची लुट सुरू होती. जिल्हा गुणवत्ता नियंत्रणचे किरण विरकर व विभागीय आधिकारी उल्लास ठाकूर, आभिजीत घुमरे तपासणीसाठी आले असता त्यांना वरील प्रकार बघावयास मिळाला. कायदा- सुव्यवस्था दावणीला बांधून सदर खताची विक्री होत होती. याची साधी भनकही निफाड पंचायत समिती कृषी आधिकारी वा कृषी विभागाच्या आधिकार्‍यांना नसल्याचे समजते. घटनेबाबत सायखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून संबधित कंपनीवर गुन्हा दाखल होऊन संशयिताना अटक झाल्याचे समजते.

- Advertisement -

कठोर कारवाई करावी

कोणत्याच पिकाला बाजारभाव नाही. यात दुष्काळी परिस्थिती आणि द्राक्ष उत्पादक व अन्य शेतकरी पोटाला चिमटा घेऊन खते, बियाणे विकत घेतो. पण सत्यम अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज्सारख्या कंपन्या बळीराजाला फसवतात. शासनाने कडक कारवाई करावी. – कैलास भोसले, अध्यक्ष, राज्य द्राक्ष बागातदार संघ विज्ञान समिती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -