घरमहाराष्ट्रनाशिकचिमुकली अत्याचार, खूनप्रकरणी चुलत्याला फाशी; तिघांना सात वर्षे सक्तमजुरी

चिमुकली अत्याचार, खूनप्रकरणी चुलत्याला फाशी; तिघांना सात वर्षे सक्तमजुरी

Subscribe

सख्या चुलत्याने पाच वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष लैंगिक अत्याचार करत बायडिंग वायरने गळा आवळला होता

सख्या चुलत्याने पाच वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष लैंगिक अत्याचार करून बायडिंग वायरींगने गळा आवळून खून करणार्‍या नराधमाला सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. तर इतर तिघांना सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. प्रथमच अशा प्रकारची शिक्षा सुनावली गेली आहे.

माळेदुमाला, वणी येथील पाच वर्षे आणि सात महिने वयाच्या चिमुकलीला तंबाखु आणावयास पाठवून घरात कोणीच नसल्याचे पाहात चुलता विलास महाले याने तिच्यावर अमानुष बलात्कार करूनबायडिंग वायरने गळा आवळून खुन केला. यानंतर मृतदेह कोंबड्या झाकण्याच्या टोपलीखाली झाकून ठेवला. विलासचा भाऊ प्रवीण महाले व आई शैलाबाई महाले तेथे आल्यावर त्यांनी विलासला तेथून पळून जाण्यास भाग पाडले, मात्र यानंतर चिमुकलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असताना हा सर्व प्रकार उघडकीस आला होता. नाशिक येथील सत्र न्यायालयात न्यायमूर्ती सुचित्रा घोडके यांनी सुप्रीम कोर्टाचा बचनसिंग केसचा दाखला देत विलास महाले यास फाशीची शिक्षा सुनावली, तर त्याची आई, भाऊ व वडील यांना प्रेताची विल्हेवाट लावण्यास व पुरावा नष्ट करणे, खुनातील आरोपीला सहकार्य करणे या प्रकरणी दोषी ठरवून त्यांनाही सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सरकारी वकील एस. एस. गोरे यांनी काम पाहिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -