घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'आधी हेवीवेट नेत्यांची वसुली करा, मगच शेतकर्‍यांची वसुली करा'; जिल्हा बँक कर्जवसूली...

‘आधी हेवीवेट नेत्यांची वसुली करा, मगच शेतकर्‍यांची वसुली करा’; जिल्हा बँक कर्जवसूली विरोधात धरणे आंदोलन

Subscribe

नाशिक : हेवीवेट नेत्यांची वसुली आधी करा, मगच शेतकर्‍यांची वसुली करा या मागणीसह इतर मागण्यांसाठी विविध शेतकरी संघटनांनी जिल्हा बँक प्रशासनाविरोधात आंदोलन सुरु केले आहे. नाशिक येथे 1 जून रोजी नाशिक जिल्हा बँकेच्या थकीत कर्जाच्या नोटीसा गोदावरी नदी पात्रात बुडवून सुरू केलेले आंदोलन, धरणे उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जागा उपलब्ध नसल्याने जिल्हा रुग्णालयासमोर अनंत कान्हेरे मैदानासमोर सुरु करण्यात आले आहे.

आंदोलनाच्या चौथ्या दिवशी उपोषंण सुरूच आहे, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचार्‍यांनी आंदोलनास भेट दिली. भेटीमधून काहीही निष्पन्न झाल्याने उपोषण आंदोलन सुरूच आहे आज सोमवारी (दि.5) आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे,
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दत्तू शिरसाट,निव्रुती गारे, राज्य समन्वयक कुबेर जाधव, रवींद्र महादू शेवाळे कैलास कोकरे यांनी आपल्या लेखी निवेदनाद्वारे पाठिंबा दर्शवला, तसेच बी, आर, एस, पक्षाचे राज्य समन्वयक नाना बच्छाव यांनी या आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे.

- Advertisement -

आदिवासी संघर्ष समिती या संघटनेच्या वतीने राज्याध्यक्ष कैलास बोरसे यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे, यामुळे आंदोलनाची व्याप्ती वाढली आहे, आंदोलनात सर्वच शेतकरी संघटना सामील होण्याची शक्यता आहे, लवकरच प्रहार शेतकरी संघटन संघटना, व मनसे सहभागी होऊन हळूहळू आंदोलन तीव्र होऊन ते नाशिक पुरते मर्यादित न राहता आंदोलनाचे लोन राज्यभरातील १७ जिल्हा मध्यवर्ती बँकांपर्यंत जाऊन धडकेल.

आंदोलनात शेतकरी संघटनेचे सुधाकर मोगल, भगवान बोराडे, कैलास बोरसे (डागसौंदाणे) दिलीप पाटील (देवळा) नाना पाटील आहेर, दगाजी अहिरे, (डागसौंदाने )रमेश अहिरे (तळवाडे)रावसाहेब ऐतवाडे (सांगली) रामराव मोरे (देवळा) बाळासाहेब भंडारे, भाऊसाहेब भंडारे, (सुकेने ) रामनाथ भंडारे दत्तात्रय सुडके (उगाव) सुनील देवरे (वाजगाव )नंदकुमार देवरे वाजगाव चिंधू पाटीलपगार, (वनी )मच्छिंद्र जाधव (येवला) खंडेराव पाटील (नाशीक )नवनाथ गावले (सोनगाव) नामदेव पवार (नीफाड )बाजीराव शिंदे (नादुडे) भगवंतराव भडारे (नीफाड )गंगाधर शिंदे (रौळश) शिवलाल परदेशी (पिंपळगाव) उमाकांत शिंदे (रौंळश) दत्तू पाटील (रुई)तुषार गांगुर्डे (पिपरी) पुंजाराम कडलक (कोठूरे)सोमनाथ खंडेराव (मोगरे साने) मोतीनाना पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

- Advertisement -

या आहेत आंदोलनकर्त्यांच्या मागण्या

या आंदोलनाद्वारे प्रमुख मागण्या करण्यात आल्या. यामध्ये कर्ज वसुली तात्काळ थांबवावी, सहकार कायदा 1960 व 61 कलमाने सुरू केलेली कारवाई कलम 101 107 व 10085 अन्वेये सुरू केलेली कारवाई थांबवावी, शेतकर्‍यांच्या सातबारा खाते उतार्‍यावरील लावली जाणारी नावे तात्काळ थांबवावी, तसेच ज्यांची नावे लावली आहेत ते तात्काळ काढण्यात यावेत, शेतकर्‍यांकडे कर्जाचे मुद्दलच्या वर व्याज झाले आहे. त्यामुळे वसुली करण्यात येऊ नये, बँकेच्या संचालकांच्या 182 कोटी वसुली साठी सहकार मंत्र्यांनी सहकार मंत्र्यांनी दिलेली स्थगिती तात्काळ उठवावी अशा हेवी वेट नेत्यांची वसुली आधी करावी, मगच सर्व सामान्य शेतकर्‍यांची वसुली करावी. जिल्हा बँकेच्या झालेल्या चौकशी अहवालाप्रमाणे तात्काळ कारवाई करावी हे आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे असे आवाहनही शेतकरी नेते सुधाकर मोगल, भगवान बोराडे, कैलास बोरसे, दिलीप पाटील, आदी प्रमुख नेत्यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -