घरमहाराष्ट्रनाशिकभातोडे शाळा उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड

भातोडे शाळा उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड

Subscribe

गणित सुलभ होण्यासाठी अबॅकसचा वापर

ज्ञानेश्वर क्षीरसागर । नाशिक

राष्ट्रीय शिक्षण संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या वतीने दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या भातोडे शाळेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारसाठी निवड झाली आहे. देशातून पाच नाविन्यपूर्ण उपक्रमाची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली असून महाराष्ट्रातून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वणी मुली केंद्रातील जिल्हा परिषद भातोडे शाळेच्या ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या गणित संबोध सुलभ होण्यासाठी अबॅकसचा वापर या नाविन्यपूर्ण उपक्रमाची निवड झाली आहे.

- Advertisement -

ग्रामीण आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये गणितीय बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी अबॅकस या प्राचीन तंत्राचा वापर करणे. नॅशनल टीचर्स अवॉर्ड फॉर इनोव्हेटिव्ह प्रॅक्टीसेस अ‍ॅण्ड एक्सपरीमेंट्स इन एज्युकेशन या स्पर्धेमध्ये उपक्रमाचा विषय आहे. जिल्हा परिषदेच्या भातोडे शाळेतील ज्योती बापू आहिरे यांनी विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला व त्याचे सादरीकरण राष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन, ऑफलाईन पध्दतीने केले. देशातून आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून पाच उपक्रमांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय शिक्षण संशोधन प्रशिक्षण परिषदेचे पथक भातोडे शाळेला भेट देऊन उपक्रमाची पडताळणी करणार आहे. एनसीआरटी दिल्लीद्वारा आयोजित ‘नॅशनल टीचर्स अवॉर्ड फॉर इनोव्हेटिव्ह प्रॅक्टीसेस अँड एक्सपरीमेंट्स इन एज्युकेशन’या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भातोडे, ता. दिंडोरी, येथील उपशिक्षिका ज्योती अहिरे यांनी यांनी सादर केलेल्या नवोपक्रम आराखड्याची निवड करण्यात आली. संपूर्ण देशभरातून स्पर्धेसाठी नवोपक्रम सादर करण्यात आले होते. त्यापैकी महाराष्ट्रातून या एकमेव नवोपक्रमाची निवड झाली आहे.

गणित हा विषय कठीण असल्याने तो लहानपणापासून सोपा जावा व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, यासाठी हा विषय अबॅकसच्या सहायाने वेगळ्या पध्दतीने शिकवता येतो. अबॅकसच्या अभ्यास पद्धतीमुळे मुलांच्या दैनंदिन अभ्यासामध्ये मोठा बदल जाणवतो. विद्यार्थी अतिशय हुशारीने आकडेमोड करतात. त्यामुळे मेंदूचा विकास होण्यास नैसर्गिकपणे मदत होते. या नवोपक्रमासाठी त्यांनी आपल्या वर्गातील इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांना अबॅकस विषयाचे अध्यापन केले.
अबॅकस हा विषय आपल्या ग्रामीण आदिवासी परिसरात संपूर्णतः नवीन आहे. यासाठी शिक्षकांनी स्वतः अबॅकस शिकून आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना त्याचे अध्यापन केले. या नवोपक्रमाच्या पडताळणीसाठी एनसीआरटी दिल्ली येथील सदस्य लवकरच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भातोडे येथे भेट देणार आहेत. यासाठी शाळेतील सर्व सहकारी बंधू-भगिनींचे त्यांना सहकार्य लाभले.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता महत्वाची असून विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांना अध्ययन अध्यापनात येणार्‍या अडचणीचा विचार करून गणित हा विषय सुलभ व सोपा होण्यासाठी अबॅकसचा वापर सुरू केला. त्याचा चांगला परिणाम दिसत आहे. – ज्योती आहिरे, शिक्षिका

तालुक्यात सर्वच शिक्षक विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. भातोडे शाळेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याने इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी असून तालुक्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. – भास्कर कनोज, गटशिक्षणाधिकारी, पं.स. दिंडोरी

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -