घरमहाराष्ट्रनाशिकशिंदे टोलनाक्यावर स्थानिक वाहनांना ‘टोलमुक्त स्वतंत्र लेन’

शिंदे टोलनाक्यावर स्थानिक वाहनांना ‘टोलमुक्त स्वतंत्र लेन’

Subscribe

आंदोलन स्थगित : शिंदे, पळसे, मोह, चिंचोली गावांना सुविधा

महामार्गावरील शिंदे टोलनाक्यावर स्थानिकांना फास्टॅग लावण्याच्या निर्णयाला विरोध करत सहा गावांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या कठोर भूमिकेनंतर टोलनाका व्यवस्थापन नरमले असून ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करत लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे सांगितले तरीही चार गावांना सुविधा देण्याबाबत कंपनी लवकरच निर्णय घेणार असल्याचे टोल व्यवस्थापनाने सांगितले.

शिंदे टोल नाक्याच्या आसपासच्या गावांतील वाहनांना बुधवारी (दि.१) पासून फास्टॅग लावण्याचा निर्णयाने सहा गावांतील नागरिकांमध्ये तीव्र संताप होता. सोमवारी (दि.३०) शिंदे, पळसे येथील नागरिकांनी टोल नाक्यावर व्यवस्थापनाबरोबर चर्चा केली. टोल प्रशासनाने इन्कार केल्याने संतप्त ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात शिंदे गावचे सरपंच गोरख जाधव, बालम बोराडे, संजय तुंगार, पळसे येथील उपसरपंच दिलीप गायधनी, युवा नेते नवनाथ गायधनी, भाऊसाहेब गायधनी, माधव गायधनी, रवींद्र टावरे यांनी वरीष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्याशी चर्चा केली.

- Advertisement -

बिजली यांनी व्यवस्थापक दीपक वैद्य व नवनाथ केदार यांना पोलीस ठाण्यात बोलावून वाहनधारकांना सोयी-सुविधा पुरवण्याची जबाबदारी टोल प्रशासनाची असल्याचे सांगत, कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला तर व्यवस्थापनाच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगितल्यावर वैद्य यांनी एक महिन्यात सर्व मागण्यांची पूर्तता करुन देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आज होणारे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती नवनाथ गायधनी यांनी दिली. दरम्यान शिंदे, पळसे, मोह, चिंचोली गावाप्रमाणे चांदगिरी, जाखोरी, मोहगाव, बाभळेश्वर या गावांचाही समावेश करण्याचा निर्णय टोल व्यवस्थापन करणार असल्याचे व्यवस्थापक दीपक वैद्य यांनी सांगितले.

शिंदे टोल नाक्यापासून पाच किलोमीटर अंतरातील गावामधील वाहनधारकांना टोल माफ करण्याचा नियम आहे, त्याप्रमाणे शिंदे, पळसे, चिंचोली, मोह आदी गावांना ज्या प्रमाणे सुविधा देत आहात त्याच प्रमाणे चांदगिरी, जाखोरी, मोहगाव, बाभळेश्वर गावांतील वाहन धारकांना मिळावी, नियमाप्रमाणे आम्हाला वगळून चालणार नाही. – रामहरी कटाळे, उपसरपंच, चांदगिरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -