घरमहाराष्ट्रनाशिकमहात्मा फुले कला दालनात शाडू गणेशमूर्ती प्रदर्शन

महात्मा फुले कला दालनात शाडू गणेशमूर्ती प्रदर्शन

Subscribe

शाडू माती मूर्तिकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन विघ्नहर्ता’ संकल्पना

पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिका आणि जिल्हा शाडू माती मूर्तिकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन विघ्नहर्ता’ ही संकल्पना राबवण्यात आली आहे. मूर्ती विक्रेत्यांना महात्मा फुले कला दालन येथे शाडू मातीच्या गणेशमुर्तींचे प्रदर्शन व विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन महापालिका आयुक्त कैलास जाधव आणि पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

१० सप्टेंबर पर्यंत गणेश मूर्तीं तसेच सजावट साहित्य यांचे प्रदर्शन व विक्री सुरू राहणार आहे. तसेच घरगुती गणेश उत्सव साजरा करणार्‍या गणेशभक्तांना ऑनलाइन पद्धतीने मूर्ती आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, उपायुक्त मनोज घोडे पाटील, प्रदीप चौधरी, शहर अभियंता नितीन वंजारी, कार्यकारी अभियंता देवेंद्र वनमाळी, पशुवैद्यकीय अधिकारी प्रमोद सोनवणे, विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र, आदी उपस्थित होते.

मिशन विघ्नहर्ता उपक्रमा अंतर्गत पर्यावरण पूरक शाडू मूर्ती यांचे प्रदर्शन आयोजित करून भाविकांना शाडूच्या मूर्ती वापरण्याचे आवाहन करणे हा अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. नागरिकांनी देखील पर्यावरण जपण्यासाठी शाडूच्या मातीचे गणपती विकत घ्यावेत. शासकीय कर्मचारी, अधिकारी यांनीही या मूर्ती घेऊन आनंदाने गणेशोत्सव साजरा करावा. – दीपक पाण्डेय, पोलीस आयुक्त

प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जनाने गोदावरी नदीसह उपनद्यांत प्रदूषण होते. त्यामुळे या मूर्ती खरेदी करण्याऐवजी प्रदर्शनस्थळी येऊन शाडूच्या मूर्ती घ्याव्यात. असे केल्यास या कलाकारांना प्रोत्साहन मिळेल. यामुळे या उत्सवाचा वेगळा आदर्श लोकांसमोर नेता येईल. मागच्यावेळी देखील कोरोना होता. त्यामुळे नियम सर्वांना माहिती आहेत. सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करत उत्सवाचा आनंद घ्यावा. – कैलास जाधव, आयुक्त महापालिका

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -