घरमनोरंजनOTTवर मनोरंजनाची मेजवानी,सिंड्रेला, शँग-ची, ब्लॅकविडो सहीत 'हे' सिनेमा-सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस

OTTवर मनोरंजनाची मेजवानी,सिंड्रेला, शँग-ची, ब्लॅकविडो सहीत ‘हे’ सिनेमा-सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस

Subscribe

उत्कंठावर्धक, रहस्यपूर्ण बेव सीरीजनेतर प्रेक्षकांच्या मनोरंजनात आणखीन भर पडली.

कोरोना काळात(corona virus) थेटर बंद असल्यामूळे अनेक सिनेमाप्रेमी घरच्या घरी मोबाइलवरच आवडते सिनेमा ,वेब सीरीज पाहून मनोरंजन करत असे.दरम्यान याचा पुरेपूर फायदा ओटीटी(OTT) प्लॅटफॉर्मने घेतला. प्रेक्षकांना भरभेट मनोरंजन पुरवण्याची जबाबदारी अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मने घेतल्याने बिग बजेट सिनेमाही थेटर उघडण्याची वाट न पाहता सरळ सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्याचा निर्णय घेऊ लागले. याचबरोबर उत्कंठावर्धक, रहस्यपूर्ण बेव सीरीजनेतर प्रेक्षकांच्या मनोरंजनात आणखीन भर पडली. चित्रपट असो किंवा सीरिज, ज्या प्रेक्षकांना सलग न थांबता बघायला आवडतं अशा चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या वीकेंडला तुमच्यासाठी एका पेक्षा एका चित्रपट आणि सीरिजची मेजवानी असणार आहे. या लिस्टमध्ये सिंड्रेला’, मार्व्हलचे ‘शँग ची अँड दि लेजंड्स ऑफ टेन रिंग्ज’, ‘ब्लॅक विडो’, ‘फास्ट अँड फ्यूरियस ९’ आणि ‘मनी हाइस्ट5’

शँग ची अँड दि लेजंड्स ऑफ टेन रिंग्ज

सिमु लिऊ, औकाफिना मेंझर झांग,फला चेन, बेनेडिग्ट वोंग यांच्यासह मायकेल येओ आणि टोनी लॉइंग या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असणारा सिनेमा इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नड अशा भाषेत ३ सप्टेंम्बर २०२१ म्हणजे आजपासून सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

- Advertisement -

फास्ट अँड फ्यूरियस ९

भारातादेखील हॉलिवूड सिनेमा आवडीने पाहिले जातात, यामुळे सिनेमाचे मेकर्स देखील प्रेक्षकांसाठी बहुभाषेत सिनेमा प्रदर्शित करण्याचे निर्णय घेतात. फास्ट अँड फ्यूरियस ९ सिनेमा इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नड भाषेत आज प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

सिंड्रेला-

मॉडर्न परीकथा सांगणाऱ्या अॅमेझोन प्राइमच्या ‘सिंड्रेला’ चित्रपटामध्ये कॅमिला कार्बेलो हिची मुख्य भूमिका आहे. के कॅनन यांच्या दिग्दर्शना अंतर्गत तयार झालेल्या हा सिनेमा अॅमेझॉन प्राइमवर आज प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

ब्लॅक विडो

आतंरराष्ट्रीय पातळीवर प्रदर्शित झाल्यानंतर स्कार्लेट जॉन्सन यांची भूमिका असलेला ‘ब्लॅक विडो’ हा चित्रपट आता भारतातही डिझनी हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे.

मनी हाइस्ट-

या वेब सीरिजचा चाहतावर्ग दर जगभरात आहे. या वेब सीरिजची चर्चा सर्वश्रूत असून याचा आगामी सीझनची केव्हा भेटीला येणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले होते. आता प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली आहे. मनी हाइस्ट 5 volume1 आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


हे हि वाचा – अमृता फडणवीस यांच नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, गणेश वंदनेचा व्हिडीओ व्हायरल

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -