घरताज्या घडामोडीआंतरराष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेत मुरुडच्या छायाचित्रकार नितीन शेडगेने मारली बाजी

आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेत मुरुडच्या छायाचित्रकार नितीन शेडगेने मारली बाजी

Subscribe

या स्पर्धेत अमेरिका,ऑस्ट्रेलिया यासारख्या विविध देशांतील ३४४ छायाचित्रकारांनी भाग घेतला होता.

दिल्ली येथील जेसीएम फोटोग्राफिक सोसायटीने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी स्फर्धेत मुरुड जंजिरामधील छायाचित्रकार नितीन शेडगे याने बाजी मारली आहे. या स्पर्धेत अमेरिका,ऑस्ट्रेलिया यासारख्या विविध देशांतील ३४४ छायाचित्रकारांनी भाग घेतला होता. इंडियन इंटरनॅशनल फोटोग्राफिर काउंसिल, फोटोग्राफिक फेडरेशन ऑफ इंडिया आणि वाईल्डलाईफ फोटोग्राफी असोसिएशन ऑफ इंडिया या नामांकित संस्थेच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मोनोक्रोम फोटोग्राफी,कलर फोटोग्राफी,नेचर फोटोग्राफी आणि फोटो ट्रॅव्हल असे विषय फोटोग्राफी स्पर्धेसाठी ठेवण्यात आले होते. या सर्व विषयांवर सुमारे ३५०० फोटोंवर ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने पार पडली.सदर स्पर्धेत मुरुडचे छायाचित्रकार नितीन शेडगे यांना फोटो ट्रॅव्हल विषयात गोल्ड मेडल मिळवून बाजी मारली. नितीन शेडगे यांच्या ‘बेस्ट ऑफ फेस्टिव्हल ‘ या फोटोला गोल्ड मेडल मिळाले. इतर विषयात चार फोटोना एक्सेप्टेन्स मिळाले असून त्यांच्या या यशाबद्दल छायाचित्रकार नितीन शेडगे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यापूर्वीदेखील छायाचित्रकार नितीन शेडगे यांनी राष्ट्रीय पातळीवर अनेक पदके मिळवली. याअगोदरही जे सी एम फोटोग्राफिक सोसायटीने आयोजित  केलेल्या  जागतिक पातळीवरील ‘आसाम सर्किट २०२०’ फोटोग्राफी स्पर्धेत एका छायाचित्राला सर्टिफिकेट ऑफ मेरिट अवॉर्ड मिळाला होता. या स्पर्धेत भारतातील विविध राज्यांतून तीनशे छायाचित्रकारांनी भाग घेतला होता , यावेळी तीन हजार पाचशे छायाचित्रांमधून दोनशे पंचवीस बक्षिसपात्र छायाचित्र निवडली व त्याचे प्रदर्शन १० आणि ११ ऑक्टोबर २०२० रोजी चेन्नई येथे भरविण्यात आले होते, नितीन शेडगे यांनी मुरुडचे नाव देश विदेशात पोहोचविले आहे त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्थरातून कौतुक करण्यात आले.

- Advertisement -

                                                                                              -अमूलकुमार जैन 


हे ही वाचा –  Mumbai Monsoon : पावसामुळे मुंबईतील रस्त्यांची अक्षरश: चाळण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -