घरमहाराष्ट्रनाशिकशिवसेनेचे बॉसिंग चालणार नाही, खासदार रक्षा खडसेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

शिवसेनेचे बॉसिंग चालणार नाही, खासदार रक्षा खडसेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Subscribe

किरीट सोमय्या प्रकरणावरून खासदार रक्षा खडसे यांचा इशारा

जळगाव : महाराष्ट्रात सध्या अत्यंत चुकीचे राजकारण सुरू आहे. एखाद्या आरटीआय कार्यकर्त्याला भ्रष्टाचाराची माहिती काढणे हा अधिकार आहे. मात्र, किरीट सोमय्या यांना पुण्यात ज्याप्रकारे खाली पाडून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला ती घटना चुकीचे आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्राचे नेते आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते जर अशाप्रकारे कृत्य करत असतील तर ते योग्य नाही. मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्तेही राज्यात दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे मुळीच खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा खासदार रक्षा खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला.

खासदार खडसे यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न हा एसटी महामंडळ बंद होऊन खासगीकरण कसे करता येईल यासाठी आहे. सरकारचा फायदा कसा होईल यासाठी महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. जेव्हा राज्य सरकारला टॅक्स कमी करण्याची वेळ येते त्यावेळेस जनतेचा विचार केला जात नाही याउलट वाईनला परवानगी दिली जाते, असा आरोपदेखील रक्षा खडसे यांनी केला. खरोखर जनतेविषयी महाविकास आघाडी सरकारला चिंता आहे तर केंद्र सरकार एक पाऊल मागे घेतले तर राज्य सरकारने घेऊन वरील टॅक्स कमी करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

- Advertisement -

वाईनविक्रीचा निर्णय दुर्दैवी

कर कमी न करता कोरोनाच्या काळातही वाईनला परवानगी देण्यात येते हे चुकीचे असल्याचा आरोप खडसे यांनी केला. राज्यात दारूबंदीसाठी महिला आंदोलन करत आहेत. मात्र, राज्य सरकार दारू विक्रीला परवानगी देत असेल तर हे चुकीचे आहे, असही रक्षा खडसे यांनी सांगितले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -