घरमहाराष्ट्रनाशिकनामको बँकेच्या पदाधिकार्‍यांचे खांदेपालट; 'हे' आहेत नवे कारभारी

नामको बँकेच्या पदाधिकार्‍यांचे खांदेपालट; ‘हे’ आहेत नवे कारभारी

Subscribe

नाशिक : नाशिक मर्चन्ट्स को-ऑप बँकेच्या उपाध्यक्षपदी सटाण्याचे उद्योजक महेंद्र बुरड यांची तर जनसंपर्क संचालकपदी महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते यांची निवड करण्यात आली. बँकेच्या सातपूर येथील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी अध्यक्ष वसंत गिते यांनी मावळते उपाध्यक्ष अशोक सोनजे व जनसंपर्क संचालक रंजन ठाकरे यांचा गौरव केला. यावेळी बोलतांना वसंत गिते म्हणाले, आज ठिकठिकाणी बँकेच्या निवडणुका बिनविरोध होत आहेत. नामको बँकेची प्रगती कौतुकास्पद आहे.

आपण सर्वजण राजकीय जोडे बाजूला ठेवून कामकाज करत असल्यानेच बँक सक्षमपणे उभी असल्याचे त्यांनी सांगितले. गणेश गितेंच्या माध्यमातून निफाड तालुका व महेंद्र बुरड यांच्या माध्यमातून कसमादे परिवार निश्चितपणे भरीव प्रगती करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी बँकेचे संचालक जेष्ठ संचालक सोहनलाल भंडारी, हेमंत धात्रक, विजय साने, शिवदास डागा, सुभाष नहार, प्रकाश दायमा, प्रशांत दिवे माजी आमदार संजय चव्हाण, जेष्ठ नेते बंडुकाका बच्छाव आदींसह संचालक उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -