घरमहाराष्ट्रनाशिकविशेष : व्यसन आजही ठरतंय संसाराला मारक

विशेष : व्यसन आजही ठरतंय संसाराला मारक

Subscribe

"तुझ माझ जमेना"

नाशिक : कौटुंबिक वाद टोकाला गेल्याने पती-पत्नी घटस्फोटासह व्यसनांच्या आहारी जात असल्याने समुपदेशकांना आढळून आले आहे. व्यसन करू नको, असे सांगूनही पती-पत्नीमध्ये कोणताही बदल होत नाही. त्यातून दोघांमधील वाद टोकाला जात आहेत. विशेष म्हणजे, पतीला दारुचे व्यसन आणि पत्नीला मोबाईल व शॉपिंगचे व्यसन असल्याने आर्थिक नियोजनासह संसाराची घडी विस्कटत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

नाशिक शहरात दिवसेंदिवस घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये पती-पत्नीच्या आईचा हस्तक्षेप, सोशल मीडिया व व्यसनाधिनता कारणीभूत आहे. पतीला दारूचे व्यसन, पत्नीला मोबाईल आणि शॉपिंगचे व्यसन असल्याने दोघांमध्ये वाद होत असल्याचे समुपदेशकांचे म्हणणे. एकवेळ संसार सोडेन पण मोबाईल सोडणार नाही, अशी भूमिका पत्नीची असते. तर पत्नी ऐकत नसल्याने पती दारू व सिगारेट व्यसन करत असल्याचे समुपदेशकांच्या निदर्शनास आले. व्यसनाधिनता रोखण्यासाठी नात्यामध्ये सुसंवाद गरजेचा आहे.

वाढत्या घटस्फोटांमुळे कुटुंब व्यवस्था धोक्यात आहे. व्यसनाधिनतेमुळे अनेक कुटुंब विस्कळीत होत आहेत. पत्नी व पतीमध्ये समजूतदारपणा व कुटुंबातील सदस्यांनी ऐकाची बाजू न घेता दोघांच्या म्हणणे ऐकून समेट घडवून आणली तर कुटुंब टिकू शकेल. : विद्या देवरे-निकम, सहायक सरकारी अभियोक्ता

व्यसनाधिनतेमुळे  दाम्पत्यातील वाद वाढल्याचे निरीक्षण आहे. पत्नी आणि पतीने व्यसनावर नियंत्रण ठेवल्यास वाद होणार नाहीत. व्यसनाधिनतेमुळे होणार्‍या वादातून घटस्फोट मिळवण्याची प्रकरणे वाढली आहेत.  : धर्मेंद्र चव्हाण, वकील

घटस्फोटांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. बदलेली जीवनमूल्ये, व्यसनाधिनता, करिअरला कुटुंबापूर्वी असलेले प्राधान्य ही प्रमुख कारणे घटस्फोटामध्ये आहेत. संवाद व समजून घेण्याच्या वृत्तीचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. दांपत्यांमधील आपापसांत अपेक्षित असलेला विश्वास व विवाह व्यवस्थेवरील आस्था प्रबळ झाल्यास हे प्रमाण निश्चितच कमी होईल. : सृष्टी चांडक, वकील

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -