घरक्राइमकर्जाचा तगादा टाळण्यासाठी लढवली शक्कल; लुटल्याचा बनाव करत दिली फिर्याद

कर्जाचा तगादा टाळण्यासाठी लढवली शक्कल; लुटल्याचा बनाव करत दिली फिर्याद

Subscribe

नाशिक : कर्जदारांनी वसुलीसाठी तगादा लावल्याने चिकनविक्रेत्याने आपल्याला मारहाण करून दुचाकी व दुचाकीच्या डिक्कीत असलेले एक लाख रुपयांची चोरी केल्याची फिर्याद नाशिकरोड पोलिस ठाण्यात नोंदविली. नाशिकरोड पोलिसांनी याबाबत गुन्ह्याचा सखोल तपास केल्यानंतर फिर्यादीनेच मित्रांच्या सहायाने चोरी केल्याचा बनाव केल्याचे उघडकीस आले आहे. अश्पाक मुश्ताक खाटीक (रा. शिखरेवाडी, देवळाली) असे संशयित चिकन विक्रेत्याचे नाव आहे.

नाशिकरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अश्पाक गत बुधवारी (दि.२५) दुपारी तीन वाजेच्या सुमारास दुचाकी (एमएच १५ इएल ३६१६)ने देवळालीगावातून विहितगाव येथे चिकन पुरवठा करणार्‍या साजिद शेख यांना गाडीच्या डिक्कीत ठेवलेले १ लाख ५ हजार रुपये देण्यासाठी चालला होता. विहितगाव सिग्नलजवळ अश्पाक गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करून मोबाइलवर बोलत असताना पाठीमागून दुचाकीवर दोन युवक तोंडाला रुमाल बांधून आले. त्यांनी अश्पाकला शिवीगाळ करून ढकलून दिले. त्यानंतर दुचाकीसह डिक्कीत ठेवलेले १ लाख ५ हजार रुपयाची रोकड घेऊन पळून गेले. याप्रकरणी अश्पाकने नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला.

- Advertisement -

पोलिसांनी गुन्हा घडला त्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक करून यापूर्वी अशा प्रकारे जबरी चोरी करणार्‍या सर्व संशयिताची माहिती घेतली. पोलिसांना अश्पाक याच्या मागून दोन जण आल्याचे एका सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फुटेजमध्ये दिसले. मात्र, लागलीच असलेल्या दुसर्‍या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये पाठीमागून तोंडाला रुमाल बांधून आलेले दोघेजण दिसत नव्हते. त्यामुळे पोलिसांना अश्पाकवरच संशय आली. त्यांनी अश्पाककडे चौकशी केली असता त्याने चोरीच न झाल्याची कबुली दिली. पाच लाखांचे कर्ज असल्याने व पैसे घेणार्‍यांनी तगादा लावल्याने हा बनाव दोन मित्रांच्या मदतीने रचल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -