घरताज्या घडामोडीकरोनाची साखळी तोडण्यात यश : पालकमंत्री छगन भुजबळ

करोनाची साखळी तोडण्यात यश : पालकमंत्री छगन भुजबळ

Subscribe

मालेगांवची परिस्थिती नियंत्रणात

करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे रेड झोनमध्ये आलेल्या नाशिक जिल्हयात करोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आले आहे. आजमितीस मालेगांवसह जिल्हयात १८६ करोना बाधित रूग्ण उपचार घेत असून पॉझिटिव्ह रूग्णांबरोबरच बरे होण्याचे प्रमाणही दिलासादायक असल्याचे सांगत करोनाच्या संकटातून जिल्हा सावरतोय असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

आजपासून लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू झाला. यासंदर्भात नाशिक जिल्हयाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना भुजबळ म्हणाले की, माझ्या ५२ वर्षाच्या राजकिय आणि सामाजिक कार्दकिर्दीत संपूर्ण जग बंद आहे हा माझा आयुष्यातील पहीला अनुभव आहे. परंतु आता हे भय हळूहळू कमी होतयं. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्य सरकार करोनाचा मुकाबला करण्यासाठी पावलं टाकत आहे. मुंबई, पुण्यानंतर मालेगांव हा करोनासाठी हॉटस्पॉट ठरला त्यामुळे साहजिकच नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सर्वांसाठीच हे संकट नवीन असल्याने परिस्थिती नियंत्रणात आण्यासाठी सुरूवातीला थोडा गोंधळ उडाला. परंतु अनुभवातून शिकत गेलो आणि आज जिल्हयात करोनाची साखळी तोडण्यात आपल्याला यश आल्याचे ते म्हणाले. पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत असली तरी, नाशिक आणि मालेगांवमधून शेकडो रूग्ण बरे होउन घरी गेले. आजमितीस मालेगांवसह संपुर्ण जिल्हयात केवळ १८६ करोना बाधित रूग्ण रूगणालयांत उपचार घेत असल्याचे ते म्हणाले. रूग्णांच्या स्वॅब टेस्टिंगसाठीही आता जागा उपलब्ध आहे. मविप्रच्या लॅबमध्ये दररोज २०० नमुने तपासणी केले जातात तर मालेगांवचे स्वबॅ धुळयाला पाठवण्यात येत असल्याने एकाच लॅबवर येणारा लोड कमी झाला आहे. लॉकडाउनमध्ये शिथीलता देण्यात आली आल्याने बाजारपेठांमध्ये मोठया प्रमाणावर गर्दी होत असल्याने धोका वाढू शकतो याबाबत विचारले असता ते म्हणाले, गेल्या दोन महीन्यांपासून बाजारपेठा बंद होत्या, लोक घरात होते त्यामुळे अनेक वस्तुंचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे साहजिकच बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून येत आहे. मात्र हळूहळू ही गर्दी कमी होईल असे सांगत वाईन शॉप उघडले तेव्हा पहील्याच दिवशी गोंधळ उडाला मात्र आता तेथील गर्दी कमी झाली. लोकही आता जागरूक झाले आहेत त्यामुळे उगाच कोणी फिरण्यासाठी म्हणून बाहेर पडत नाही आणि आता तर लोकांच्या हाती फारसा पैसाही नाही. गर्दीवर पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन होत असल्यास पोलीस कारवाई करतील असेही त्यांनी सांगितले. करोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी तयारी करण्यात आली आहे. जिल्हयाची वाटचाल करोनामुक्तीच्या दिशेने असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisement -

करोनामुक्ती दराबाबत समाधान
करोनाबाधितांना बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्याचे नियम बदलण्यात आले आहे. त्यानूसार दहा दिवसांत औषधउपचारांना रूग्ण प्रतिसाद देत असेल अशा रूग्णाला कोणतेही लक्षण दिसत नसतील तर, त्यांना घरी सोडता येते त्यानूसार नाशिक जिल्हयात ६९ टक्के म्हणजेच ७७८ रूग्णांपैकी ५३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ही निश्चितच समाधानकारक बाब असल्याचे भुजबळ म्हणाले.

पॉवरलूमचा प्रश्न गंभीर
अर्थचक्र फिरण्यासाठी उद्योग, आस्थापनांना परवानगी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्हयात ४४० कंपन्या सुरू करण्यात आल्या असून या कंपन्यांमध्ये १७ हजार मजूर काम करत आहेत. उद्योगधंदे सुरू झाले पाहीजे परंतु मालेगांवच्या पॉवरलूमबाबत मात्र परिस्थिती गंभीर आहे. मालेगांवमधील सुमारे ३ लाख कामगार पॉवरलूमध्ये काम करतात. सध्या लॉकडाउनमुळे कच्चा मालही मिळत नाही आणि तयार झालेला मालही बाहेर पाठवता येत नसल्याने हे उद्योग बंदच आहे. त्यामुळे या कर्मचार्‍यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत शासनाशी चर्चा सुरू असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -