Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र सातबाऱ्यावर नाव लावण्यास तलाठ्याने केली अडवणूक, मोहबदल्यात मागितली लाच

सातबाऱ्यावर नाव लावण्यास तलाठ्याने केली अडवणूक, मोहबदल्यात मागितली लाच

Subscribe

नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकने उत्तर महाराष्ट्रात छापासत्रे सुरु केले असले तरी लाचखोरी थांबली नसल्याचे छाप्यांवरून समोर आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकच्या पथकाने तलाठ्यास हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. तर अहमदनगरच्या पथकाने अहमदनगर तालुका पतसंस्था फेडरेशनच्या विशेष वसुली व विक्री अधिकार्‍यास फोन पे वरून लाच घेतल्यानंतर अटक केली. या कारवाईमुळे लाचखोर अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

महसूल अभिलेखवर नाव लावण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिकच्या पथकाने शुक्रवारी (दि.१५) कर्‍हेगाव (ता. सटाणा) येथे तलाठ्यास अटक केली. चंपालाल सुरेश चव्हाण (वय 40, श्रीकृष्ण नगर, ता. सटाणा, जि. नाशिक) असे अटक केलेल्या तलाठ्याचे नाव आहे.

- Advertisement -

चव्हाण हे वर्ग तीनचे अधिकारी आहेत. ते सजा आराई व रामतीचे कामकाज पाहतात. तक्रारदारांच्या वडिलांनी त्यांच्या नावे असलेली शेतजमीन तक्रारदार व त्यांचा भावाच्या नावे वाटणी करून दिली होती. त्याची कागदपत्रे तक्रारदारांनी चव्हाणकडे महसुली अभिलेखावर नावे लावण्यासाठी दिली. चव्हाण याने महसूल अभिलेखवर नाव लावण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे 21 ऑगस्ट 2023 रोजी 20 हजार रुपये लाचेची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिककडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पथकाने शहानिशा करून सापळा रचला. तक्रारदाराकडून शुक्रवारी (दि.15) २० हजार रुपये स्विकारताना पथकाने कर्‍हेगाव (ता. सटाणा) येथे चंपालाल सुरेश चव्हाण यास अटक केली.

हेही वाचा : कर्जबाजारी शेतकऱ्याकडून पतसंस्थेच्या वसूली अधिकाऱ्याने थेट ‘फोन-पे’वर घेतली लाच

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -