घरमहाराष्ट्रनाशिकशहरभरात लक्ष्मीपूजनाचा उत्साह, घरोघरी लगबग

शहरभरात लक्ष्मीपूजनाचा उत्साह, घरोघरी लगबग

Subscribe

नाशिक : अंगणात रांगोळी, दारी झेंडूच्या माळा, घरात फराळासह लाह्या, बत्ताश्यांचा नैवेद्य करण्याची लगबग, मंगलधून आणि धनलक्ष्मीसह कुबेर आणि आराध्य देवतांच्या पूजेची तयारी.. अशा चैतन्यमयी वातावरणात आज (दि.२४) घरोघरी लक्ष्मीपूजन केले जाणार आहे.

दिवाळी सणामधील महत्त्वाचा दिवस अर्थात लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठा पूजासाहित्यासह खरेदीसाठी झालेल्या ग्राहकांच्या गर्दीने फुलल्या होत्या. लक्ष्मीपूजनाही ही लगबग उशीरापर्यंत सुरू होती. सोमवारी (दि. २४) अर्थात दिवाळीच्या तिसर्‍या दिवशी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन केले जाणार आहे. अश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीपूजन केले जाते. दिव्यांच्या झगमगाटात आनंदी चेहर्‍याने लक्ष्मीला आमंत्रित करून घरोघरी, व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये लक्ष्मीची पूजा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने आता घरोघरी तयारीची लगबग सुरू होती.

- Advertisement -

आपापल्या घरी, दुकानांत, व्यवसायाच्या स्थानी सदैव लक्ष्मीदेवतेचा वास असू दे, अशी मनोभावे प्रार्थना करत लक्ष्मीपूजनाची प्रथा आहे. लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील सर्वांसाठी पर्वणीचा दिवस मानला जातो. सोमवारी साजर्‍या होणार्‍या लक्ष्मीपूजनानिमित्त रविवारी पूजा साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठा फुलून गेल्या होत्या. पुजेसाठी लागणारे लाह्या, बत्तासे, बोळके व इतर साहित्य खरेदीसाठीही नागरिकांची दिवसभर लगबग दिसून आली. वसुबारसने दिवाळीच्या प्रकाश पर्वाला सुरुवात झाली.

अशी करा पूजा

श्री लक्ष्मीपूजनावेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना करावी. त्यानंतर लक्ष्मीसह अन्य देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याच्या नैवेद्य दाखवा. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इ. पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते कुटुंबातील सदस्यांना प्रसाद म्हणून द्या.

- Advertisement -
नरक चतुर्दशीमागील ही आहे कथा

अश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशीच्या दिवशी नरक चतुर्थी साजरी केली जाते. नरकासूर राक्षसाचा संहार या दिवशी केला होता. नरकासूर नावाचा असूर हा मानवांना प्रचंड त्रास देत होता. तेव्हा श्रीकृष्णाने या राक्षसाचा वध केला. नरक चतुर्थी अर्थात आजच्या दिवशी मंगलस्नान करणार्‍या व्यक्तीला नरकाची पीडा होऊ नये, असा वर या नरकासुराने मृत्यूसमयी मागितला होता, अशी या दिवसाची कथा सांगितली जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -