आलिया – रणबीरची लग्नानंतरची पहिली दिवाळी; असं करणार सेलिब्रेशन

रणबीर कपूर याने आई बनणाऱ्या आलीय सोबत कशी दिवाळी साजरी करणार याबाबत खुलासा केला आहे.

ranbir kapoor alia bhatt

फेस्टिवल सिझन मध्ये प्रत्येकाचेच काही न काही प्लॅन्स असतात आणि त्यातही बॉलिवूड सेलिब्रिटींचे धमाकेदार सेलिब्रेशन असते. अशातच मागील काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये दिवाळी पार्टीचं आयोजन केलं जात आहे. क्रिती सेनन, एकता कपूरपासून ते अगदी मनीष मल्होत्रा यांच्या घरी दिवाळी पार्टीचं आयोजन केलं होतं. दिवाळी निमित्त अनेक सेलिब्रिटी एकमेकांच्या घरी दिवाळी पार्टी निमित्त हजेरी लावत आहेत. पण कपूर घरात मात्र डिवचले पार्टीचं आयोजन केले गेले नाही. अशातच रणबीर कपूर याने आई बनणाऱ्या आलीय सोबत कशी दिवाळी साजरी करणार याबाबत खुलासा केला आहे.

आलीया आणि रणबीर ही बॉलिवूड मधील एक लोकप्रिय जोडी आहे. या दोघांचाही मोठा चाहता वर्ग आहे. या दोघांसंदर्भांत प्रत्येक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. आलीया आता लवकरच आई होणार आहे त्यामुळे रणबीर सुद्धा तिची खूप काळजी घेत आहे. दिवाळी पार्टीबद्दल रणबीरने नुकताच खुलासा केला आहे. या बद्दल बोलताना रणबीर म्हणाला, ”आमच्या कुटुंबातील सर्वांना आता अशा प्रकारच्या पार्टीचा भाग व्हायचं नाही. म्हणून आम्ही शांततेत दिवाळीचा उत्सव साजरा करत आहोत. आम्ही आमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना दिवाळीच्या निमित्ताने भेटत आहोत पण आम्ही कोणत्याही पार्टीचा भाग होत नाही.

दरम्यान अभिनेता रणबीर कपूरला त्याच्या दिवाळीच्या प्लॅन्स बद्दलही विचारण्यात आल्यावर रणबीर म्हणाला, ‘आम्ही करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या घरी दिवाळी सेलिब्रेशनसाठी गेलो होतो. त्यांनी सर्व कुटुंबीयांना दिवाळीनिमित्त त्यांच्या घरी बोलावल होते. आम्ही सर्व कुटुंबीयांनी तिथेच दिवाळी साजरी केली. जेव्हा आम्ही कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र असतो तेव्हा तीच आमच्यासाठी पार्टी असते असंही रणबीर म्हणाला.

रणबीर मीडियापासून दार असला तरी तो स्वतःचे आणि कुटुंबियांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. कपूर घ्यारण्याच्या सर्व बहिणींचा रणबीर लाडका भाऊ आहे. रणबीरला रिद्धिमा ही सख्खी बहीण आहे. तर करिश्मा आणि करीना या चुलत बहिणी आहेत. सर्वच बहिणींसोबत राणीरचे खूप घट्ट बॉण्डिंग आहे. आलिया आणि रणबीर यावर्षी दिवाळीत एकमेकांसोबत आणि कुटुंबासोबत वेळ घालवून दिवाळी साजरी करणार आहेत.


हे ही वाचा –  भारताच्या दमदार विजयानंतर अनुष्काची विराटसाठी खास पोस्ट; म्हणाली…