घरमहाराष्ट्रनाशिकनाशिककरांना दिलासा! सोमवारपासून मॉलही होणार सुरू

नाशिककरांना दिलासा! सोमवारपासून मॉलही होणार सुरू

Subscribe

पन्नास टक्के क्षमतेची अट कायम,वीकेंडला मात्र पूर्णतः लॉक डाऊन

नाशिक शहरासह जिल्ह्यातील मॉल्स सोमवारपासून (दि.२१) सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने आज घेतला. मात्र, त्यासाठी  मॉल्ससाठीदेखील ५० टक्के क्षमता आणि दुपारी ४ वाजेपर्यंतच्या वेळेचे बंधन घालून देण्यात आले आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राज्य सरकारने निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नाशिकमध्येही कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेऊन तिसऱ्या टप्प्याचे नियम लागू करण्यात आले होते. त्यानुसार सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळात विविध आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कोरोना संसर्ग पुन्हा परतू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने मॉल्स, तरणतलाव, चित्रपटगृहांवरील बंदी कायम ठेवली. मात्र, परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने शनिवारी झालेल्या कोरोना आढावा बैठकीत मॉल्स सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला.

- Advertisement -

नाट्यगृह, मल्टीप्लेक्स मात्र बंदच

मॉल्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असली तरीही नाट्यगृह आणि मल्टीप्लेक्स मात्र बंदच राहणार असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -