घरमहाराष्ट्रनाशिकगंगापूर रोडवर ई-बाईक बर्निंगचा थरार

गंगापूर रोडवर ई-बाईक बर्निंगचा थरार

Subscribe

नाशिक : गंगापूर रोडवरील विद्या विकास सर्कल परिसरातील फुटपाथवर पार्क केलेल्या ई-बाईकने पेट घेतल्याची घटना गुरुवारी (दि.२९) दुपारी घडली. ही बाब व्यावसायिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आग प्रतिरोधक पावडर फवारली. अग्निशमन दलाच्या बंबाने दुचाकीला लागलेली आग विझविली.

रवींद्र आव्हाड हे गुरुवारी (दि.२९) दुपारी एक वाजेदरम्यान ई-बाईकवरुन गंगापूर रोडवरील विद्या विकास सर्कल परिसरात आले. त्यांनी फुटपाथजवळ बाईक पार्क केली. ते खरेदीसाठी दुसर्‍या ठिकाणी गेले असता त्यांच्या ई-बाईकमधून मोठ्या प्रमाणावर धूर निघू लागला. आव्हाड हे बाईकजवळ आले असता त्यांना धूर निघत असल्याचे दिसून आले. त्यांनी आरडाओरड केली. तोपर्यंत बाईकने पेट घेतला होता. ही बाब परिसरातील व्यावसायिकांच्या लक्षात येताच व्यावसायिकांनी दुकानातील आग प्रतिरोधक पावडरीची फवारणी बाईकवर केली. या घटनेची माहिती गंगापूर पोलीस व शिंगाडा तलाव येथील अग्निशमन दलास मिळताच घटनास्थळी बंबासह जवान दाखल झाले. जवानांनी बाईकवर फवारणी करत आग विझविली. या घटनेमुळे परिसरात काहीवेळ भितीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -
दोनच महिन्यापूर्वी घेतली गाडी

दुग्ध व्यावसायिक असलेल्या रविंद्र आव्हाड यांच्याकडे व्यवसायाच्या निमित्ताने इतरही दुचाकी वाहने आहेत. मात्र, पर्यावरण पूरक वाहन असावं या हेतूने दोनच महिन्यापूर्वी त्यांनी ही ई-बाईक खरेदी केली होती. तब्बल ९० हजार रुपये किमतीची ई-बाईक पूर्णतः जळून खाक झाली आहे. आता किमान इम्श्युरंस तरी मिळावा अशी भावना आव्हाड यांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -