घरमहाराष्ट्रनाशिकदत्तप्रसाद नडे यांच्यासह तीन अप्पर जिल्हाधिकार्‍यांची बदली

दत्तप्रसाद नडे यांच्यासह तीन अप्पर जिल्हाधिकार्‍यांची बदली

Subscribe

नाशिक : जिल्ह्यातील तीन अपर जिल्हाधिकार्‍यांची एकाच दिवशी बदली झाली. यात खानपट्टे प्रकरणामुळे वादग्रस्त ठरलेले दत्तप्रसाद नडे यांच्यासह प्रज्ञा बढे-मिसाळ व अरुण आनंदकर यांचाही बदलीत समावेश आहे. नडे यांची मुंबईत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळात बदली झाली. त्यांच्या जागेवर बाबासाहेब पारधे यांची नियुक्ती झाली. तर, आनंदकर व मिसाळ यांना नाशिकमध्येच नियुक्ती मिळाली आहे.

शासनाने बुधवारी (दि.२) रात्री उशिरा बदलीचे आदेश दिले. अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांचा अजून सहा महिन्यांचा कार्यकाळ बाकी असताना त्यांनी स्वत: बदली करुन घेतली आहे. जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी खनिकर्म विभागाची जबाबदारी काढल्यानंतर नडे हे बदलीसाठी प्रयत्न करत होते. दिवाळीपूर्वीच बदली मिळावी यासाठी त्यांचा प्रयत्न होता. खानपट्ट्यांच्या बाबत निर्माण झालेला वाद वगळला तर नडे यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ चांगला राहिला आहे.  त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली. कोरोना संकटकाळात त्यांनी ऑक्सिजनची उपलब्धता आणि वाटपाचे केलेले काम उल्लेखनीय होते. तत्पर आणि गतिमान अधिकारी म्हणून अल्पावधीत त्यांची ख्याती निर्माण झाली होती.

- Advertisement -

तसेच, महसूल वसूली आणि फाईल्सचा तात्काळ निपटारा करणे या कामात त्यांचा हातखंडा होता. नडे यांची मुंबई येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ येथे नियुक्ती झाल्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातुन जाणार्‍या समृध्दी महामार्गाच्या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात प्रशिक्षण प्रबोधिनीत असलेले अरुण आनंदकर यांची नाशिक महापालिकेत अतिरिक्त आयुक्त या पदावर प्रतिनियुक्तीने बदली झाली आहे. तर, प्रज्ञा बडे-मिसाळ यांची विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त (रोहयो) या रिक्त पदावर बदली झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -